शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: सावत्र पित्याचा मुलावर अमानुष अत्याचार; व्हिडिओ व्हायरल होताच अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:08 IST

एका चिमुकल्याला केल्या गेलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहुन तुमचा संताप होईल अन् तळपायाची आग मस्तकात जाईल.

लहान मुलं म्हटलं की आपण त्यांना देवाचं रुप मानतो. मुलं म्हणजे देवाघरची फुलं ही उक्ती फार प्रचलित आहे. या कोवळ्या जीवाला त्रास देण्याचा विचारही आपण करु शकत नाही. पण काही असे हैवान असतात ज्यांना की कोवळी फुलं कुस्करायला जास्त आवडतात. अशा लोकांच्या अमानुषपणासमोर जणू देवही हात टेकेल. अशाच एका चिमुकल्याला केल्या गेलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहुन तुमचा संताप होईल अन् तळपायाची आग मस्तकात जाईल.

Panglima Perang RimauNaga या महिलेनं हा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हिच त्या मुलाची आई आहे. या मुलाला मारहाण करणारा या मुलाचा सावत्र पिता आहे. तो एक ट्रक ड्रायव्हर आहे. या महिलेनं दुसरं लग्न केलेलं कारण त्या लहानग्या मुलाला वडिलांचं प्रेम मिळावं. पण हे करताना तिच्यावर पश्चातापाची वेळ येईल असा विचार तिनं केला नव्हता. 

व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या लहान मुलाचं रडणं आणि किंकाळ्या स्पष्ट ऐकू येतील. त्याच सावत्र पिता त्याला इतक्या निर्दयीपणे मारहाण करतोय की ते पाहताना तुमच्या अंगावर शहारे येतील. तो मुलाच्या बेमालुमपणे कानशिलात लगावत आहे. इतके कमी काय म्हणून त्याचा हात पिरगळत आहे. बिचारी त्याची माय गयावया करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण हा हैवान थांबेल तर शप्पथ तो अजुन अमानुषपणे मुलाला मारहाण करतोय. 

या महिलेनं या सावत्र पित्याचा मुलाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर पोस्ट केलाय. तिनं हे करण्यामागचं कारण म्हणजे या प्रकरणाला वाचा फुटावी. ही घटना मलेशियातील शाह आलम येथील आहे. महिलेनं सांगितलं की त्याच्या सावत्र पित्याकडून झालेला प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड व्हावा या उद्देशाने तिनं कॅमेरा बेडरुममध्ये लपवून ठेवला होता. ही घटना २५ फेब्रुवारीची असल्याचे सांगतिले जात आहे. तिने मागील महिन्यात दुसरे लग्न केले होते. त्यानंतर तिच्या या पतीने तिच्या मुलाचे हे हाल केले. दरम्यान पोलिसांनी या नराधम सावत्र पित्याला अटक केली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक