Viral video : हल्ली सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर केले जातात. या व्हायरल व्हिडीओने कित्येकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली तर काही लोक रातोरात स्टार झाले.
दरम्यान, याआधी नसीब वडापाववाले या संगमनेर येथील अन्सार चाचा यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दिल्लीतील एका भेलपुरी विकणाऱ्या काकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या व्यवसायाला कलेची जोड देत ग्राहकांचे लक्ष वेधणारे भेलपुरीवाले काका सध्या चर्चेचा विषय ठरलेत. पाहायला गेल्यास रस्त्यांवर सहज उपलब्ध स्ट्रीट, नमकीन फुड्स हे प्रत्येकजण चवीने खातात. त्यात पाणीपुरी आणि भेलपुरी म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
या व्हायरल व्हिडीओमध्ये भेलपुरी विकणारे काका अगदी विनोदी अंगाने ग्राहकांची थट्टा, मस्करी करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती प्रामुख्याने दिल्लीच्या उत्तर भागात रस्त्यांवर भेलपुरीचा गाडा लावतात. केवळ दोन वेळच्या जेवणासाठी उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन हाती नसल्याने या व्यवसायाचा पर्याय निवडल्याचे काका सांगतात.
अवघ्या ६० रुपयांमध्ये मिळणाऱ्या या भेलपुरीसाठी ग्राहकांची झुंबड उडल्याचे चित्र दिसत आहे. 'माझं दुकान ३८ वर्षांचं आहे आणि मी २१ वर्षांचा', अशा पद्धतीने मिश्किल विनोद करत भेलपुरीवाले ग्राहकांचे आकर्षण बनले आहेत. एक्सवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ :