Viral Video : नोएडा आणि मेरठ दरम्यानच्या अनेक रस्त्यावर आणि भींतींवर 'सॉरी बुबू' असं लिहिलेले पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. एका अज्ञात व्यक्तीनं हे पोस्टर चिकटवले आहेत. हे पोस्टर बघून लोक अवाक् झाले आहेत. तर लोकांना प्रेम व्यक्त करण्याची किंवा माफी मागण्याची ही अनोखी स्टाइल लोकांनाही आवडली आहे.
काही लोकांना अंदाज लावला की, 'बाबू' शब्द चुकीच्या पद्धतीनं तर लिहिला नाही ना किंवा मुद्दामहून 'बुबू' असंच लिहिलं. जळपास ३० ते ४० पोस्टर बॉटनिकल गार्डन मेट्रो स्टेशनजवळ एक फुट ओवरब्रिजजवळ बघण्यात आले. तर मेरठच्या गंगानगर भागातही अनेक पोस्टर दिसले. लोकांनी या पोस्टरचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. लोकांसोबतच या पोस्टरनं पोलिसांचंही लक्ष वेधलं आहे. पोलिसांना संशय आहे की, हा कुणाचातरी खोडसाळपणा असेल. त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
पोस्टरवर 'सॉरी बुबू'शिवाय दुसरं काहीही लिहिलेलं नाही. फक्त दोन किंवा तीन इमोजी आहेत. हे पोस्टर बघून लोक अवाक् झाले असून हे कुणी केलं असेल याचा अंदाज लावत आहेत. हे पोस्टर कुणासाठी लावण्यात आले याचीही लोकांमध्ये उत्सुकता दिसत आहे. काही लोकांना ही माफी मागण्याची ही स्टाइल आवडली तर काहींना हा केवळ खोडसाळपणा वाटला.
दरम्यान एका महिलेची नजर या पोस्टरवर पडली आणि त्यानी या पोस्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. आता या व्हिडीओवर हजारो लोक प्रतिक्रिया देत अंदाज व्यक्त करत आहेत.
पोलिसांनी याकडे गंभीरतेने लक्ष घातलं आहे. त्यांनी चौकशी सुरू केली असून शहरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं जात आहे. पोलीस शोध घेत आहेत की, पोस्टर लावण्यामागे भावनात्मक अपील आहे की केवळ खोडसाळपणा आहे.