रेस्टॉरंटमध्ये माणसाने केले असे काही की लोकांनी विचारलं, पहिल्यांदा आलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:39 IST2021-07-07T19:16:09+5:302021-07-07T19:39:37+5:30

काही गोष्टींची आपल्याला सवय नसते आणि आपण ते पहिल्यांदा करायला जातो तेव्हा कधी कधी आपलं हसं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक ना एक तरी अनुभव आलाच असेल.

Something that a man did in a restaurant, people asked, did you come for the first time? | रेस्टॉरंटमध्ये माणसाने केले असे काही की लोकांनी विचारलं, पहिल्यांदा आलात का?

रेस्टॉरंटमध्ये माणसाने केले असे काही की लोकांनी विचारलं, पहिल्यांदा आलात का?

असं बरेचदा होतं की आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो आणि आपल्याला तेथील रितीरिवाज माहिती नसतील तर आपण गोंधळून जातो. काही गोष्टींची आपल्याला सवय नसते आणि आपण ते पहिल्यांदा करायला जातो तेव्हा कधी कधी आपलं हसं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक ना एक तरी अनुभव आलाच असेल.
इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरलं होतोय. या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती जे काही करतेय ते पाहुन तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडिओत एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या व्यक्तीबाबत गमतीदार किस्सा घडला आहे. या व्यक्तीकडे बघुन तुमच्या लगेचच लक्षात येईल की ही व्यक्ती पहिल्यांदा महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेली आहे.


या व्हिडिओत एक व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसली आहे. समोर डिशमध्ये काहीतरी आहे. ती व्यक्ती काटा चमच्याने ते तोडत आहे पण ते तुटता तुटत नाहीये. मग ही व्यक्ती ते हाताने तोडायला जाते आणि पटकन जीभ चावते. कारण ती वस्तू खाण्याचा पदार्थ नसून नॅपकीन असते. 
बघा मग हा व्हिडिओ आणि आठवा तुमच्या बाबतीतही असं कधी झालं होत का?

Web Title: Something that a man did in a restaurant, people asked, did you come for the first time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.