शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Video - याला म्हणतात नशीब! रातोरात बनला मॉडेल; 60 वर्षीय मजुराच्या जबरदस्त लूकची तुफान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 11:29 IST

Social Viral Video Mamikka : रोजंदारीवर काम करणारा मजूर 60 व्या वर्षी मॉडेल झाला असून त्याने सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ काढला आहे.

नवी दिल्ली - एखाद्याचं नशीब कधी, कुठे आणि कसं बदलेल ही सांगता येत नाही. अनेक जण रातोरात स्टार झाल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. रोजंदारीवर काम करणारा मजूर 60 व्या वर्षी मॉडेल झाला असून त्याने सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ काढला आहे. मजुराच्या जबरदस्त लूकची सध्या तुफान चर्चा रंगली आहे, सोशल मीडियावर या मजुराची प्रचंड हवा असलेली पाहायला मिळत आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मम्मिका असं या 60 वर्षीय मजुराचं नाव असून तो केरळच्या कोझिकोडचा रहिवासी आहे. 

मम्मिका नेहमीच साधी लुंगी आणि शर्टमध्ये असायचा. मात्र त्याचा आता झालेला सुपरडूपर मेकओव्हर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मॉडेलप्रमाणे केलेल्या फोटोशूटमुळे तो रातोरात हिट झाला आहे. त्याचा हा 'ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ' फोटोग्राफरने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामुळे आता मम्मिका त्याच्या गावात स्टार बनलाय आणि सर्वत्र फक्त त्याचीच क्रेझ पाहायला मिळत आहे. व्हिडीओची सुरुवात जुनी लुंगी आणि जुनाट शर्ट घालून निघालेल्या एका वृद्ध व्यक्तीपासून होते. त्यानंतर त्याचं रूपांतर होत असलेलं पाहायला मिळतं. 

मम्मिक्काच्या रूपाने सापडला मॉडेल 

दाढी ट्रिम करणं, केस कापणं आणि इतर अनेक सलून ट्रीटमेंट नंतर, मम्मिक्का त्याच्या फोटोशूटसाठी सज्ज होतो. व्हिडिओचा शेवट संपूर्णपणे नवीन लूकमध्ये असलेल्या आणि व्यावसायिक मॉडेलप्रमाणे पोज देणाऱ्या व्यक्तीत होतो. मम्मिक्का या प्रसिद्धीमुळे खूप खूश आहे. फोटोग्राफर शारिक वायलीलने सर्वप्रथम मम्मिक्काला पाहिलं आणि अभिनेता विनायकन यांच्याशी साम्य असल्याने त्याने फेसबुकवर त्याचा फोटो पोस्ट केला. वेडिंग सूट फोटोशूट करण्याचं ठरवलेल्या वायलीलला मम्मिक्काच्या रूपाने त्याचा मॉडेल सापडला.

रोजंदारीवर काम करणारा मजूर 60 व्या वर्षी झाला मॉडेल

सूट, टाय आणि सनग्लासेस घातलेल्या मम्मिक्काने शूटसाठी हातात आयपॅड घेऊन पोज दिली. दुसर्‍या फोटोमध्ये, मम्मीक्कानं जोधपुरी सूट, पगडी, एथनिक ज्वेलरी आणि सनग्लासेस परिधान केले होते. त्‍याच्‍या हातात एक छोटी तलवार देखील होती. सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्यानंतर त्याने रोजंदारीवर काम करण्याच्या त्याच्या कामाव्यतिरिक्त मॉडेलिंग करण्याचा प्रयत्न करायचा असल्याचं म्हटलं आहे. त्याने इंस्टाग्रामवर देखील एन्ट्री केली असून आता तो इन्स्टाग्रामवर या शूटमधील फोटो पोस्ट करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके