शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान ते भारत प्रवास, रेल्वेच्या AC-3 कोचचं भाडे फक्त ४ रुपये; तिकीट पाहून लोक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 14:43 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेल्वेचे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या पेजने फेसबुकवर शेअर केले आहे.

नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या काळातील दराचे रेल्वे तिकीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे तिकीट पाकिस्तानमधील रावळपिंडी ते अमृतसर दरम्यानच्या प्रवासासाठी आहे. नऊ प्रवाशांच्या प्रवासासाठी हे तिकीट काढण्यात आले होते. सोशल मीडियावर एवढं जुनं तिकिट आणि किंमत पाहून लोक हैराण झाले आहेत. त्यावेळी नऊ जणांच्या तिकिटासाठी केवळ ३६ रुपये आणि ९ आणे आकारले जात होते. लोक आजच्या तिकीट दराशी याची तुलना करत आहेत. 

तिकीट सोशल मीडियावर व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेल्वेचे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या पेजने फेसबुकवर शेअर केले आहे. तिकिटाचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १७-०९-१९४७ रोजी रावळपिंडी ते अमृतसर प्रवास करण्यासाठी ९ लोकांना जारी करण्यात आलेल्या रेल्वे तिकिटाचा हा फोटो आहे. ज्याची किंमत ३६ रुपये आणि ९ आणे आहे. कदाचित एखादे कुटुंब भारतात गेले असावे. हे ९ लोकांसाठी तिकीट आहे. म्हणजे त्याकाळी माणसाचे भाडे सुमारे ४ रुपये असायचे.

पेनाने लिहून दिलेले तिकीटया रेल्वे तिकीटाची तारीख १७ सप्टेंबर १९४७ आहे. पेनच्या साहाय्याने हे तिकीट हाताने बनवले आहे. त्याकाळी संगणकीकृत तिकीट प्रचलित नव्हते. तिकीट उत्तर पश्चिम रेल्वेचे आहे. एसी-३ कोचचे असल्याचेही तिकिटावर लिहिलेले आहे. या पोस्टच्या कमेंटमध्ये लोकांनी सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानच्या भागात नॉर्थ वेस्टर्न रेल्वे झोन होता. तिकिटावरील हे तिकिट परदेशी नागरिकाचे आहे, अशी प्रतिक्रिया काही लोकांनी दिली. बरं, त्यावेळी पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी तिकीट मिळणं सोपं होतं, पण आता ही प्रक्रिया खूपच अवघड झाली आहे.

रेल्वेचे जुने तिकीट पाहून पोस्टवर कमेंटचा पाऊस१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. यानंतर पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर लोक भारतात आले. हे तिकीट त्या कुटुंबांपैकी कोणाचेही असू शकते. फोटोवर कमेंट करत लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तारा चंद नावाच्या यूजरने लिहिले की, 'त्या काळात ही किंमत खूप जास्त असतील, काही श्रीमंत लोक असतील, सामान्य लोक पायी चालत होते. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानrailwayरेल्वे