Social Viral: बापरे एवढे धाडस कोण करेल? नळाखाली तापलेला कोब्रा बसलेला; तरुणाने बादली डोक्यावर ओतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:32 IST2022-03-31T16:28:09+5:302022-03-31T16:32:53+5:30

व्हिडीओमध्ये  दिसतेय की, उन्हाने तापलेला कोब्रा थंडाव्यासाठी एका घराच्या बाजुला असलेल्या नळाखाली फणा वर काढून थांबला होता. दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय.

Social Viral: A cobra sitting under a pipe; The young man poured the bucket water over his head in extrem Heat | Social Viral: बापरे एवढे धाडस कोण करेल? नळाखाली तापलेला कोब्रा बसलेला; तरुणाने बादली डोक्यावर ओतली

Social Viral: बापरे एवढे धाडस कोण करेल? नळाखाली तापलेला कोब्रा बसलेला; तरुणाने बादली डोक्यावर ओतली

सोशल मीडिया वर आज एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र तापलेले वातावरण आहे. यामुळे माणसांसारखेच प्राण्यांनाही हा दाह सहन होत नाहीय. यामुळे जवळपास दोन वर्षे जुना व्हिडीओ पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. गरमीच्या दिवसांत एक तरुण किंग कोब्राला अंघोळ घालत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी सुशांत नंदा (Sushanta Nanda) ने ट्विटरवर शेअर केला होता. 

व्हिडीओमध्ये  दिसतेय की, उन्हाने तापलेला कोब्रा थंडाव्यासाठी एका घराच्या बाजुला असलेल्या नळाखाली फणा वर काढून थांबला होता. त्याला थंड करण्यासाठी एका तरुणाने धाडस दाखवत तेथील बादलीने त्याच्या डोक्यावर पाणी टाकले. तसेच त्या कोब्राच्या डोक्यावर हात फिरवला. हा कोब्रा काही पाळीव नव्हता, तर तो जंगली होती. थंडाव्याच्या शोधात तो तिथे आला होता. हा व्हिडीओ शेअर करताना अशा प्रकारचा स्टंट करू नका, धोक्याचा ठरू शकतो, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

किंग कोब्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. 51 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title: Social Viral: A cobra sitting under a pipe; The young man poured the bucket water over his head in extrem Heat