Peru Woman Footpath Exploded Viral Video : सोशल मिडिया हे हल्लीच्या युगात प्रचंड प्रभावशाली माध्यम मानले जाते. केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही एखादी छोटी गोष्ट जरी घडली तरीही ती आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजते. काही वेळा याबद्दलचे व्हिडीओ व्हायरल होतात तर काही वेळा विषय ट्रेंड झाल्याने त्याबाबत माहिती मिळते. पण अनेकदा गोष्टी फार मोठ्या नसतात, पण तरीही काही विचित्र घडलेल्या गोष्टी सोशल मीडियावर झटपट व्हायरल होतात. तसाच काहीसा प्रकार दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशात झाल्याचे पाहायला मिळाले.
नक्की काय घडला प्रकार?
दक्षिण अमेरिकन देश पेरूमधील एक अतिशय धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. काही लोक फूटपाथवरून जात असताना जमिनीखालून मोठा स्फोट होऊन एक महिला रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याचे दिसून येते. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हे फुटेज अंगावर काटा आणणारे आहे. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की, लोक शांतपणे फूटपाथवरून जात आहेत. मात्र एक महिला तिथून जात असतानाच जमीनीखालील इलेक्ट्रिक बॉक्समध्ये स्फोट होतो. स्फोट इतका जोरदार असतो की रस्त्यावर खोल खड्डा पडतो आणि त्यामुळे महिला त्यात पडते.
सुदैवाने लष्कराचा एक जवान घटनास्थळी गस्त घालत असतो. हा प्रकार होतो तेव्हा तो पाहतो आणि तो लगेचच महिलेच्या मदतीसाठी धावतो. ही घटना ५ डिसेंबर रोजी घडला. या स्फोटात महिला गंभीर जखमी झाली आहे अशी माहिती आहे.