Video : गाडीत पेट्रोल भरत असताना महिलेसोबत झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 17:03 IST2019-09-30T14:56:25+5:302019-09-30T17:03:28+5:30
महिला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपवर थांबली असताना तिच्यासोबत गंभीर घटना घडली. सदर घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Video : गाडीत पेट्रोल भरत असताना महिलेसोबत झालं असं काही...
यूएसमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत जे झालं ते ऐकून तुम्ही खरच हैराण व्हाल. महिला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोलपंपवर थांबली असताना तिच्यासोबत गंभीर घटना घडली. लिंडा टेनेंट नावाची ही महिला पेट्रोल पंपवर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबली होती. अचानक तिथे एक हरिण आलं आणि त्याने लिंडाच्या डोक्यावरून उडी मारली. यादरम्यान, लिंडाच्या डोक्याल गंभीर दुखापत झाली असल्याचं सांगितलं जात आहे.
घडलेल्या प्रकाराचा एक व्हि़डीओ लिंडाने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला होता. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक हरिण उडी मारून लिंडाच्या डोक्यावरून गेलं. त्यावेळी महिलेच्या डोक्यावर हरिणाचा पाय जोरात लागला आणि तिला गंभीर दुखापत झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सदर घटना ब्रंसविकमध्ये बुधवारी सकाळी घडली आहे. यादरम्यान लिंडा टेनेंट ऑफिसला जात होत्या. लिंडा यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केल असून त्यांनी लिहिलं आहे की, 'कदाचित कोणाचा यावर विश्वास बसणार नाही. परंतु, ऑफिसला येत असताना एक हरणाने माझ्यावर हल्ला केला.' व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लिंडा यांना थोड्या वेळासाठी काय झालं हे समजतचं नव्हतं. लिंडाने शेअर केलेला व्हिडीओ आतापर्यंत 10 हजारवेळा पाहिला गेला आहे.