Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:34 IST2025-12-12T15:31:18+5:302025-12-12T15:34:41+5:30
Indian Railway Viral Video: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली.

Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली. या व्हिडिओमध्ये रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या एका तरुणावर तृतीयपंथी यांच्या एका गटाने हल्ला केल्याचे धक्कादायक दृश्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ मुंबई रेल्वे स्टेशनवरील असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
व्हिडिओ फुटेजमध्ये एक तरुण रेल्वे स्टेशनच्या बाकावर झोपलेला दिसतो. त्याच्याभोवती तीन तृतीयपंथी व्यक्ती उभ्या असतात. त्यापैकी एक जण आपल्या पायातील चप्पल काढते आणि झोपलेल्या तरुणाला मारायला सुरुवात. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेला आणि गोंधळलेला तरुण जागा होतो. त्यानंतरही एक तृतीयपंथी त्याला मारहाण करणे सुरूच ठेवतो. व्हिडिओच्या शेवटी तो तरूण तिथून पळून जातो आणि तृतीयपंथी त्याचा पाठलाग करतात.
Transgender Group Attacks Sleeping Youth at Railway Station, Raises Questions About Public Safety...
— VARAHA WARRIOR (@VarahaWarrior) December 11, 2025
Sometimes these people forget to stay within their limits. pic.twitter.com/AHr4HU6Mwf
वराह वॉरियर या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. फुटेजमध्ये अनेक लोक आजूबाजूने चालताना दिसत असतानाही कोणीही तरुणाला मदत करण्याचा प्रयत्न केला नाही, या सार्वजनिक हस्तक्षेपाच्या अभावावर नेटिझन्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ही घटना नेमकी केव्हा आणि कोणत्या स्टेशनवर घडली, याबद्दल कोणतीही सत्यापित माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय रेल्वेने या घटनेची दखल घेतली. रेल्वेने युजरला स्टेशनचे नाव आणि संपर्क क्रमांक यासह तक्रार करण्याचे आवाहन केले.