कुत्र्याने भर ट्रॅफिकमध्ये चालवली कार, व्हायरल व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:36 IST2018-10-02T13:35:18+5:302018-10-02T13:36:47+5:30
रस्त्यांवर सध्या इतकं ट्रॅफिक असतं की, कुणालीही गाडी चालवणं कठीण होऊन बसतं. पण शिलॉंगमध्ये चक्क एका कुत्र्याने भर गर्दीत कार चालवल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

कुत्र्याने भर ट्रॅफिकमध्ये चालवली कार, व्हायरल व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!
रस्त्यांवर सध्या इतकं ट्रॅफिक असतं की, कुणालीही गाडी चालवणं कठीण होऊन बसतं. पण शिलॉंगमध्ये चक्क एका कुत्र्याने भर गर्दीत कार चालवल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कुत्रा ड्रायव्हर सीटवर बसून भर गर्दीतून कार चालवत आहे. तर त्याच्या बाजूच्या सीटवर त्याचा मालक बसला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कार मालकावर कारवाई केली आहे. त्याला १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पोलिसांनी कार मालकाबाबत माहिती देताना सांगितले की, कार मालकावर कारवाई करण्यात आली आहे. १ मिनिट ११ सेकंदाचा हा व्हिडीओ एका महिलेने रेकॉर्ड केलाय. या महिलेची कार त्या कारच्या मागे होती. हा व्हिडीओ The Shillong Gag नावाच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ २४ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे तर ७०० पेक्षा जास्त लोकांनी शेअर केलाय.