एखाद्या व्हायरल व्हिडीओमुळे एखाद्या देशाच्या प्रिन्सला एका लहान मुलीला भेटण्यासाठी जावं लागेल, असं कधी बघायला मिळालं नाही. अनेक स्टार्स त्यांच्या एखाद्या खास चाहत्याला भेटायला गेले असं अनेकदा बघायला मिळालं. मात्र, अशात एका व्हायरल व्हिडीओमुळे दुबईच्या प्रिन्सला एका लहान मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी जावं लागल्याची घटना समोर आली आहे.  

(Image Credit : siasat.pk)

सौदी अरबचे प्रिन्स मोहम्मद बिन-सलमान संयुक्त अरब अमीरातीच्या दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमावेळी ते लहान मुलांना भेटत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लहान मुलं-मुली उभे होते. समोरून प्रिन्स या लहान मुला-मुलींचा हात हातात घेत होते. अशातच एका लहान मुलीने प्रिन्स यांच्याशी हात मिळवण्यासाठी हात समोर केला, पण प्रिन्स पुढे निघून गेले.

प्रिन्ससोबत हात मिळवण्यासाठी हात पुढे करूनही प्रिन्सने हात मिळवला नाही त्यामुळे ही मुलगी नाराज झाली. तिच्या चेहऱ्यावर ते दु:खं दिसत होतं. मग काय...या मुलीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. सगळीकडे या मुलीचीच चर्चा रंगली होती.

प्रिन्स  मोहम्मद बिन-सलमान यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आणि ते त्या मुलीला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी गेली. या मुलीचं नाव आएशा मोहम्मद मशहीत अल मजरोई असं आहे. या मुलीच्या घरी जाऊन त्यांनी सर्वांशी गप्पाही मारल्या. प्रिन्सने असं करून या लहान मुलीचं मन तर जिंकलंच, सोबतच सोशल मीडियातील लोकांची मनेही जिंकली.


Web Title: Sheikh Mohamed bin Zayed visits girl who missed out on shaking his hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.