बिबट्याला पाहताच कुत्र्याला हार्ट अटॅक; तडफडून मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 12:17 IST2021-11-06T12:13:39+5:302021-11-06T12:17:12+5:30

कुत्र्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं जागीच मृत्यू

seeing panther dog had a heart attack died in agony watch video | बिबट्याला पाहताच कुत्र्याला हार्ट अटॅक; तडफडून मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

बिबट्याला पाहताच कुत्र्याला हार्ट अटॅक; तडफडून मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

प्राणी असो वा माणूस, सगळ्यांनाच भीती वाटते. साक्षात मृत्यू समोर उभा राहिला की कोणाचीही भीतीनं गाळण उडते. राजस्थानात असाच एक प्रकार घडला आहे. एका कुत्र्याचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये गुरुवारी रात्री एका गावात बिबट्या घुसला. बिबट्या रस्त्यावरून चालला होता. बिबट्याला पाहताच कुत्रा प्रचंड घाबरला. बिबट्या दिसताच कुत्र्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन कुत्रे दिसत आहेत. दुरून एक प्राणी येत असल्याचं पाहून आधी कुत्रे त्याच्या दिशेने गेले. पण तो प्राणी बिबट्या असल्याचं लक्षात येताच कुत्रे उलट्या दिशेनं धावत सुटले. याच गडबडीत दोन्ही कुत्रे जमिनीवर पडले. बिबट्याच्या जवळ असलेल्या कुत्र्यानं तर धसकाच घेतला. त्याला हृदय विकाराचा झटका आला. कुत्र्यानं जागीच प्राण सोडला. 

Web Title: seeing panther dog had a heart attack died in agony watch video