हुबेहुब कुत्र्याचा आवाज काढतो हा पक्षी, व्हिडिओ पाहुन म्हणाल...असा नकलाकार होणे नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:30 IST2021-08-03T17:11:46+5:302021-08-03T17:30:45+5:30

तुम्ही कोणत्या प्राण्याला किंवा पक्षाला नकला करताना पाहिलं आहे का? एक पक्षी चक्क नकला करतो. तो चक्क कुत्र्याचा आवाज काढु शकतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ...

seagull bird barking like a dog, barking seagull video goes viral | हुबेहुब कुत्र्याचा आवाज काढतो हा पक्षी, व्हिडिओ पाहुन म्हणाल...असा नकलाकार होणे नाही!

हुबेहुब कुत्र्याचा आवाज काढतो हा पक्षी, व्हिडिओ पाहुन म्हणाल...असा नकलाकार होणे नाही!

माणसं उत्तम नकला करू शकतात. इतर माणसांचे आवाज काढु शकतात. माणस माणसांचेच नाहीत तर प्राण्यांचे आणि पक्ष्यांचेही आवाज काढु शकतात. पण तुम्ही कोणत्या प्राण्याला किंवा पक्षाला नकला करताना पाहिलं आहे का? एक पक्षी चक्क नकला करतो. तो चक्क कुत्र्याचा आवाज काढु शकतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ...

या व्हिडिओत सीगल नावाचा पक्षी आहे. तो सुरुवातील स्वत:च्या आवाजात ओरडतो. पण नंतर त्याच्या कानावर कुत्र्याचा आवाज पडतो. तुम्हाला ऐकुन धक्काच बसेल की सीगल नंतर चक्क कुत्र्यासारखा भूंकू लागतो. या सीगलला कुत्र्याची नक्कल करताना पाहुन तुम्हाला हसू आवरणार नाही. 

सीगल हा पक्षी जास्त करून समुद्रकिनारी दिसतो. तो खूप हुशार आणि जिज्ञासू असतो. व्हिडिओमध्ये या सीगलच्या मालक ही सुरुवातीला बोलत असतो. तो म्हणतो, मला वाटत माझा पेट सीगल भूंकतो.

Web Title: seagull bird barking like a dog, barking seagull video goes viral