कॉमेडियनच्या WhatsApp ग्रूपचे स्क्रिनशॉट व्हायरल; छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे शिवप्रेमींच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 03:46 PM2020-07-12T15:46:18+5:302020-07-12T15:52:07+5:30

अग्रिमा जाशुआचं प्रकरण ताजं असताना आता तिच्या या वक्तव्यावरुन कॉमेडियनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इतर कॉमेडियनची चर्चा आता सोशल मीडियात व्हायरल होऊ लागली आहे.

screenshots from the comedian WhatsApp group viral over agrima jashua statement on Shivaji Maharaj | कॉमेडियनच्या WhatsApp ग्रूपचे स्क्रिनशॉट व्हायरल; छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे शिवप्रेमींच्या रडारवर

कॉमेडियनच्या WhatsApp ग्रूपचे स्क्रिनशॉट व्हायरल; छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे शिवप्रेमींच्या रडारवर

googlenewsNext

मुंबई – स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जाशुआनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती, मुंबईतील शिवस्मारकाबाबत अग्रिमाने विनोदातून टीका करत छत्रपतींची थट्टा केली होती. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्याठिकाणी याचं शूट करण्यात आलेलं तो स्टुडिओ फोडून संताप व्यक्त केला होता.

अग्रिमा जाशुआचं प्रकरण ताजं असताना आता तिच्या या वक्तव्यावरुन कॉमेडियनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इतर कॉमेडियनची चर्चा आता सोशल मीडियात व्हायरल होऊ लागली आहे. यात स्टुडिओची तोडफोड तसेच अग्रिमाविरुद्ध बोलणाऱ्यांबद्दल आक्षेपाई संवाद आहेत. तसेच काहींनी अश्लिल शब्दांचाही वापर केला आहे. तर एकाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केला आहे.

या व्हॉट्सअप ग्रुपचे स्क्रिन शॉट्स सोशल मीडियात व्हायरल झाल्यापासून पुन्हा एकदा शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत संबंधितांना जाब विचारले आहेत. यातील अंकित अग्रवाल नावाच्या एका युजर्सला शिवप्रेमींना दणका दिल्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून मी त्यांची जाहीर माफी मागत आहे असा व्हिडीओ टाकला आहे. मात्र या घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियात शिवप्रेमींचा राग उफाळून आला आहे.

काय होतं अग्रिमा जाशुआचं प्रकरण?

मुंबईत अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोशुआने विनोदातून टीका केली होती. ही टीका करताना तिने शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख केला. तसेच त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. अग्रिमा म्हणाली की,  “शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी गुगलवर Quora इंटरनेट सोर्सवर गेली तर कोणीतरी निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

आठवणीतला किस्सा! जेव्हा चीनच्या पंतप्रधानांसोबत शरद पवार समुद्र किनारी वॉकिंग करत होते तेव्हा...

पाकिस्तान नव्हे तर चीन आपला शत्रू; शरद पवारांनी ठामपणे सांगितलं कारण...

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?; काँग्रेस सरकार अडचणीत

सहामाही परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास की नापास?; शरद पवारांनी सांगितला निकाल

लवकरच वुहानमधील लॅबचा भांडाफोड होणार; अमेरिकेने चीनबाबत केला ‘हा’ मोठा दावा

Web Title: screenshots from the comedian WhatsApp group viral over agrima jashua statement on Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.