सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली क्रिकेटच्या विश्वातील दोन सगळ्यात मोठी नावं आहेत. जगभरात त्यांचे कोट्यावधी फॅन्स आहेत. ज्यांना क्रिकेट आवडतं आणि ज्यांना आवडत नाही त्यांना सुद्धा ही दोन नावं माहीत असतात. दोघांच्या नावांवरील रेकॉर्ड अनेकांना तोंडपाठ असतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, या दोन दिग्गजांच्या नावावर रेल्वे स्टेशन सुद्धा आहेत. या स्टेशनच्या बोर्डाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. पण यात एक ट्विस्ट आहे.
'सचिन' नावाचं रेल्वे स्टेशन गुजरात राज्याच्या सूरत शहरात आहे. तर 'कोहली' नावाचं स्टेशन महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आहे. पण आजपर्यंत ना सचिन तेंडुलकर आणि ना विराट कोहली या रेल्वे स्टेशनवर आले.
दरम्यान या रेल्वे स्टेशनची नावं सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावावर ठेवण्यात आलेले नाहीत. हा केवळ एक योगायोग आहे की, या स्टेशनचं नाव सचिन आणि कोहली आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही रेल्वे स्टेशन सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या जन्माच्या आधीपासून आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की, या स्टेशनची नावं सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या नावावरून ठेवण्यात आलेले नाहीत.
सचिन रेल्वे स्टेशन गुजरात राज्याच्या सूरत शहराजवळ मुंबई-अहमदाबाद-जयपूर-दिल्ली लाइनवर आहे. भारतीय टीमचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी वर्ष ३०२३ मध्ये या रेल्वे स्टेशनचा दौरा केला होता आणि तिथं एक फोटोही काढला होता. कोहली रेल्वे स्टेशन नागपूरच्या सीआर रेल्वे डिव्हिजनच्या अंतर्गत भोपाल-नागपूर खंडावर स्थित आहे. हे महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील कलमेश्वर, येलकापरमध्ये राज्य महामार्ग २५० जवळ स्थित आहे.