ही दोस्ती तुटायची नाय! अस्वलाला वाचवले अन् त्यासोबत केली मासेमारी, दोघे झाले घट्ट मित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 12:30 IST2021-07-23T12:29:00+5:302021-07-23T12:30:51+5:30
अस्वल आणि या तरुणीची दोस्तीच न्यारी. दोघेही पकडतायत मासे, यांची मैत्री पाहुन तुम्हीही यांच्या प्रेमात पडाल...

ही दोस्ती तुटायची नाय! अस्वलाला वाचवले अन् त्यासोबत केली मासेमारी, दोघे झाले घट्ट मित्र
भुतदया ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. अनेकजण असे असतात जे प्राणी मित्रांवर मनापासून प्रेम करतात. बहुतेकांच्या घरी एखादा पाळीव प्राणी असतोच असतो. पोपट, काकाकुवा, लव्हबर्ड्स या पक्षांसोबतच कुत्रा, मांजर हे प्राणी पाळले जातात. परदेशात तर वाघ, सिंह यांच्यासारखे जंगली प्राणीही पाळले जातात. अशाच एका तरुणीने अस्वल पाळले आहे. ज्याच्यासोबत ती मच्छी पकडते, फोटोसेशन करते आणि आणखी बरीच धम्माल करते.
ही मुलगी रशियाची असून हीचे नाव वेनोरिका डिच्का असे आहे. तिचे तिच्या पेट अस्वलासोबत फोटो व्हायरल होत आहेत. यात ती एका बोटीवर बसली आहे आणि मासे पकडते आहे. या अस्वलाचे नाव आर्ची आहे. ती दक्षिण सायबेरियाच्या नोवोसिबिर्सक या ठिकाणी तलावात मच्छी पकडताना दिसून आली.
वेरोनिकाने या अस्वलाला सफारी पार्कमधून दत्तक घेतलं होतं. या पार्कचा बिझनेस चालत नसल्याने हे पार्क बंद होणार होतं. तेव्हापासून वेरोनिका आणि आर्चीची घट्ट मैत्री झाली आहे. दोघांना मासे पकडायला फार आवडते. आता आर्ची वेरोनिकाची फॅमिली मेंबर आहे. आर्चीला फिरायला फार आवडते. वेरोनिकाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर त्या अस्वलासोबतचा व्हिडिओही शेअर केला आहे.