शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ McDonalds मध्ये सोडले डझनभर उंदीर; पाहा धक्कादायक व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 17:28 IST

Rats Inside Mcdonalds: व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Rats Inside Mcdonalds: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल-हमास यांच्यात विनाशकारी युद्ध सुरू आहे. यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. पॅलेस्टिनी समर्थकाने निषेधाची विचित्र पद्धत अवलंबली, ज्यामुळे लोकांना जबर धक्का बसला. व्हायरल क्लिपमध्ये एका व्यक्तीने मॅकडोनाल्ड आउटलेटमध्ये डझनभर उंदीर सोडल्याचे दिसत आहे. 

हा विच्त्र व्हिडिओ बर्मिंगहॅममधील मॅकडोनाल्ड आउटलेटचा आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोक्यावर पॅलेस्टिनी ध्वज घातलेला दिसत आहे. तो कारच्या ट्रंकमधून प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेले डझनभर लाल, हिरवे, पांढरे आणि काळे उंदीर बाहेर काढतो आणि मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये सोडतो. अचानक एवढे उंदीर पाहून आऊटलेटमध्ये उपस्थित ग्राहक घाबरतात आणि मग इकडे-तिकडे धावायला लागतात.

पहा व्हिडिओ- 

‘फ्री पॅलेस्टाईन’चा नारा दिलाव्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने बनावट नंबर प्लेट धरलेली दिसत आहे, ज्यावर PAISTN आणि Free Palestine असे लिहिले होते. गाडीकडे परतताना तो माणूस वारंवार 'फ्री पॅलेस्टाईन'च्या घोषणा देताना ऐकू येतो. ‘इस्राएलवर बहिष्कार घाला’ असेही तो यावेळी म्हणाला.

मॅकडोनल्डची निवड का केली?तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या व्यक्तीने निषेध करण्यासाठी मॅकडोनाल्डची निवड का केली? याचे कारण म्हणजे, मॅकडोनाल्डने अलीकडेच हमासविरोधातील युद्धादरम्यान इस्रायली सैनिकांना मोफत फूड देण्याची घोषणा केली होती. यामुळे असा विरोध केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर मॅकडोनाल्डने रेस्टॉरंट पूर्णपणे स्वच्छ केले.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल