ये राशी कौन है रे बाबा? सोनम गुप्तानंतर 'राशी बेवफा है'; सोशल मीडियावर नोट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 11:45 IST2022-02-16T11:44:53+5:302022-02-16T11:45:52+5:30

सोनम गुप्तानंतर आता राशी बेवफा है; सोशल मीडियावर फोटोची चर्चा, मीम्सचा पाऊस

rashi bewafa hai twitter trend memes rasode me kaun tha to sonam gupta bewafa hai | ये राशी कौन है रे बाबा? सोनम गुप्तानंतर 'राशी बेवफा है'; सोशल मीडियावर नोट व्हायरल

ये राशी कौन है रे बाबा? सोनम गुप्तानंतर 'राशी बेवफा है'; सोशल मीडियावर नोट व्हायरल

सोशल मीडियावर काही ना काही व्हायरल होत असतं. या व्हायरल गोष्टींवर मीम्सचा धुमाकूळ सुरू होता. काही दिवसांवर सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' गाणं गाजलं. त्याची क्रेझही कायम आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावर 'राशी बेवफा है' असा मजकूर असलेली २० रुपयांची नोट व्हायरल झाली आहे. त्यामुळे ही राशी आहे तरी कोण, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.





२०१६ मध्ये 'सोनम गुप्ता बेवफा है' असा मजकूर असलेल्या नोटांचा फोटो व्हायरल झाला होता. त्याच्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांची क्रिएटिव्हिटीला बहार आली होती. अनेकांनी मीम्स शेअर केले. त्यानंतर आता 'राशी बेवफा है' लिहिलेल्या नोटेची चर्चा आहे. ट्विटरवर नोटेचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावर मीम्सदेखील तयार होऊ लागले आहेत.





रसोडे में कौन था हे शब्ददेखील सोशल मीडियावर गाजले होते. साथ निभाना साथिया सीरियलमधील एका प्रसंगावरून रसोडे नें कौन थाची सुरुवात झाली. त्यानंतर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच जण रसोडे में कौन था हा प्रश्न विचारू लागले. इतकंच काय यावर एक गाणंदेखील आलं होतं.

Web Title: rashi bewafa hai twitter trend memes rasode me kaun tha to sonam gupta bewafa hai