Raksha Bandhan 2022: बाबो! रक्षाबंधनासाठी तब्बल २५,००० रुपये किलो मिठाई? एवढं काय आहे खास? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 18:03 IST2022-08-05T18:02:46+5:302022-08-05T18:03:28+5:30
Social Viral : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका दुकानात गोल्डन घेवर नावाची खास मिठाई बनवली आहे. त्याची किंमत तब्ब्ल २५००० रु प्रति किलो आहे, पण का? जाणून घ्या!

Raksha Bandhan 2022: बाबो! रक्षाबंधनासाठी तब्बल २५,००० रुपये किलो मिठाई? एवढं काय आहे खास? वाचा!
रक्षाबंधनाला अवघे काही दिवस उरले आहेत. याची तयारी आतापासूनच बाजारपेठेत सुरू झाली आहे. यानिमित्ताने बाजारपेठेतील दुकानदार आणि मोठे मिठाई व्यापारी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिठाईच्या विक्रीतही वाढ होते. लोकांनी मिठाई व्यापाऱ्यांना मिठाईची आधीच ऑर्डर देऊ केली आहे. अशातच चर्चेचा विषय ठरली आहे एक खास मिठाई! चला या गोड आणि महागड्या व्हायरल व्हिडीओबद्दल जाणून घेऊ.
गोल्डन घेवर व्हायरल होत आहे :
उत्तर प्रदेशात आग्रा येथील एका दुकानाने गोल्डन घेवर नावाची खास मिठाई तयार केली आहे. घेवर हा दूध, तूप, मैदा, साखर आणि सुक्या मेव्यापासून बनवलेला पारंपारिक राजस्थानी गोड पदार्थ आहे. मात्र, या घेवरवर २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावून घेण्यात आल्याने त्याची किंमत वाढली आहे. आग्रा येथील शाह मार्केटजवळ ब्रज रसायन मिठाई भंडारने खास मिठाई तयार केली आहे. ही मिठाई खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. आतापर्यंत १२ किलो गोल्डन घेवरची विक्री झाली आहे.
दोन वर्षांनी रक्षाबंधनाचा जल्लोष :
गोल्डन घेवर हे पिस्ता, बदाम, काजू , अक्रोड सोबत अनेक प्रकारच्या सुका मेव्याचे मिश्रण आहे. वर आइस्क्रीम फ्लेवर्ड क्रीमचा थर देखील आहे. त्यामुळे मुळातच गोड असलेला हा पदार्थ अधिकच गोड बनला आहे. आणि त्याची मागणीही वाढली आहे.
१ किलो घेवर २५,०० रुपयांना
२४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावल्याने या घेवरची किंमत वधारली आहे. या संदर्भात एएनआय हिंदीने एक व्हिडिओ ट्विट केला असून या मिठाईबद्दल सांगितले आहे की, 'गोल्डन घेवर' खास आग्रा येथे बनवला जात आहे. गोल्डन घेवरचा भाव २५ हजार रुपये किलो आहे. या घेवराचे वैशिष्ट्य म्हणजे ते २४ कॅरेट सोन्याने मढवलेले आहे.
बघा हा व्हिडीओ :
#WATCH उत्तर प्रदेश: रक्षा बंधन को लेकर आगरा में खास तौर पर 'गोल्डन घेवर' बनाए जा रहे हैं। गोल्डन घेवर की कीमत 25,000 रुपए प्रति किलो है। इस घेवर की खासियत ये है कि इसके ऊपर 24 कैरेट के सोने की परत लगाई गई है। pic.twitter.com/cn1AQOyq8X