शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

"काही न करता तुम्ही इतके पैसे कसे कमवता?"; 'द कपिल शर्मा शो'मधील राज कुंद्राचा 'तो' Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:39 IST

Raj kundra Arrest And Viral Video : राज कुंद्राच्या अटकेनंतर "द कपिल शर्मा" शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

मुंबई - पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक केली. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. (Raj kundra arrest) राज कुंद्रा याच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफीक कंटेट बनवल्याच्या आणि तो अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. अशा प्रकरणात आरोपीविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद होतो. तसेच गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला दोषी ठरवले गेले तर त्याला अनेक वर्षे तुरुंगात राहावे लागू शकते. याच दरम्यान राज कुंद्राच्या अटकेनंतर "द कपिल शर्मा" शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

कपिल शर्माने आपल्या कार्यक्रमात राज कुंद्राला त्याच्या उत्पन्नाबद्दल विचारेल्या एका प्रश्नाचा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा आणि बहीण शमितासोबत "द कपिल शर्मा शो" मध्ये हजेरी लावली होती.  कपिल शर्मा राज कुंद्राला म्हणतो की "तुम्ही कधी सेलिब्रिटींसोबत फूटबॉल मॅच खेळताना दिसता, कधी फ्लाईटमध्ये तर कधी शिल्पासोबत शॉपिंग करताना दिसतात. पण जरा आम्हाला देखील सांगा काही न करता तुम्ही इतके पैसे कसे कमवता?". 

कपिलच्या या प्रश्नानंतर शोमध्ये सर्वच जण हसायला लागतात. शिल्पा शेट्टी आणि स्वत: राज कुंद्रा देखील यावर खूप हसतात. मात्र नंतर कपिलच्या या प्रश्नावर शिल्पाने पतीची बाजू सावरत राज कुंद्रा खूप मेहनत घेत असल्याचं म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याच आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असाही आरोप आहे. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजचे  व्हॉट्सअ‍ॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहे.

राज के ‘राज’! ‘या’ व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे राज कुंद्रा आला पोलिसांच्या रडारवर

राजने त्याचा नातलग प्रदीप बख्शीसोबत मिळून लंडनमध्ये केनरिन (Kenrin) नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. या कंपनीचा राज कुंद्रा अध्यक्ष आहे शिवाय बिझनेस पार्टनरही आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज अप्रत्यक्षपणे या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदारही आहे. याच कंपनीच्या माध्यमातून अनेक एजंटला पॉर्न कंटेंट बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले जायचे. एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून या कॉन्ट्रॅक्टबद्दल चर्चा व्हायची. ‘H Accounts’ नावाच्या या व्हाट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये पाच लोक होते. यात राज कुंद्राही होता.  या ग्रूपवरचे व्हाट्सअ‍ॅप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळेच राज कुंद्राला अटक झाली आहे. एका प्रदीप बक्षी नावाच्या व्यक्तीशी राजने व्हाट्सअप चॅट केले आहेत. यामध्ये राज आणि प्रदीप यांच्यात पॉर्न कंटेंटबद्दल चर्चा झाली होती. यातून होणा-या नफ्यावरसुद्धा व्हाट्सअप चॅट करण्यात आले होत. पॉर्न फिल्ममध्ये काम करणा-या अभिनेत्रींनी किती रक्कम घेतली यावरही या चॅटमध्ये चर्चा झाली होती. 

 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टीArrestअटकPoliceपोलिसMONEYपैसाKapil Sharmaकपिल शर्मा