शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर पावसाचं रौद्ररूप! महादरवाज्यातून पाण्याचा मोठा प्रवाह, VIDEO पाहून काळजाचा थरकाप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 14:08 IST

गेले २४ तास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलं आहे.

Raigad Monsoon Update : गेले २४ तास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलं आहे. पावसामुळे रायगडातदेखील ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून किल्ले रायगडाच्या पायऱ्यांवरून धबाधब्यासारखं पाणी वाहतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, कालपासून रायगडमध्ये पावसाने धुवाँधार बॅटिंग केली असून, या पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत असल्याने सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत सिंधुदुर्गला रेड तर रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, ११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच सोशल मीडियावर रायगडावरील पुर सदृश परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात पर्यटनासाठी गेलेले काही पर्यटक सुद्धा दिसून येत आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाने या पर्यटकांची वाहत्या पाण्यातून सुखरुप सुटका केली आहे. 

एकंदरीत धो-धो कोसळणारा पाऊस आणि किल्ल्याच्या पायऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा लोट पाहून कोणालाही धडकी भरेल. या पार्श्वभूमीवर आजपासून रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. काल दिवसभरात रायगड जिल्ह्यत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यातच दिवसभर पावसाची रिपरिप चालू असल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलं आहे. आपात्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता किल्ल्यावर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRaigadरायगडRainपाऊसFortगड