शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

ही कचरा गोळा करणाही महिला बोलते फाडफाड इंग्लिश, व्हिडिओ पाहुन तोंडात बोटेच घालाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:36 IST

समोरच्याचा रंग, रूप आणि कपडे पाहून त्या व्यक्तीबद्दलची मत तयार करणं टाळलं पाहिजे. सध्या याचाच प्रत्यय देणारा बंगळुरू येथील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बहुतेकदा लोक समोरच्याचा चेहरा पाहूनच त्या माणसांबद्दल मनात मत तयार करतात. मात्र, हे नेहमीच बरोबर असतं असं नाही. एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल एखादं मत तयार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे समोरच्याचा रंग, रूप आणि कपडे पाहून त्या व्यक्तीबद्दलची मत तयार करणं टाळलं पाहिजे. सध्या याचाच प्रत्यय देणारा बंगळुरू येथील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कचरा उचलणाऱ्या या वृद्ध महिलेचं इंग्रजी पाहुन तुम्हीही अवाक् व्हाल.

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला कचरा गोळा करते. मात्र, आता तिचाच जबरदस्त इंग्लिश बोलतानाचा व्हिडिओ (Video of Old Woman Speaking Fluent English) व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये (Viral Video) ती सांगते की, जपानमध्ये तिने ७ वर्ष काम केलं आहे. ७ वर्षानंतर ती भारतात परतली. ही महिला सदाशिवनगरच्या जवळ कचरा वेचत होती. या महिलेनं आपलं नाव Cecilia Margaret Lawrence असल्याचं सांगितलं. 

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, तुमच्या आजूबाजूला नेहमीच काही ना कहीतरी रंजक गोष्टी असतात. तुम्हाला फक्त डोळे उघडे ठेऊन आजूबाजूला पाहण्याची गरज आहे. यातील काही गोष्टी तुम्हाला सुंदर असतील तर काही उदास पण या कहाण्या ऐकुन तुम्हाला वाटेल की आयुष्य हे फुलासारखंच सुंदर आहे. तुमच्यापैकी कोणाला या महिलेला भेटायचं असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. 

ज्या महिलेनं हा व्हिडिओ बनवला आहे तिनं सांगितलं, की जेव्हा ती या महिलेला भेटली तेव्हा महिला कचरा उचलून प्लास्टिक एकत्र करत होती.  व्हिडिओतील वृद्ध महिलेनं सांगितलं, की प्लास्टिक विकून जे पैसे येतात, त्यातून ती स्वतःचा उदरनिर्वाह चालवते. काही लोकांनी या महिलेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामWomenमहिलाenglishइंग्रजी