शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

२६ एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून न्या; २० रुपयांच्या नोटवरील 'मेसेज' व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 12:46 PM

दीपूसाठी पुष्पाचा खास मेसेज; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

पूर्वी प्रियकर-प्रेयसी एकमेकांना कबुतराच्या माध्यमातून प्रेमपत्र पाठवायचे. मात्र आता काळ खूप पुढे गेला आहे. नव्या जमान्यात संपर्क साधण्याची नवनवी माध्यमं उपलब्ध होत आहेत. मात्र हाय टेक मेसेजिंगच्या काळातही काही जण नोटांवर विशेष व्यक्तीसाठी विशेष संदेश लिहितात. काही महिन्यांपूर्वी 'सोनम गुप्ता बेवफा है' असा मजकूर असलेल्या एका नोटेचा फोटा व्हायरल झाला होता. यानंतर आता आणखी एका नोटेचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र हा मजकूर थोड्या वेगळ्या स्वरुपाचा आहे.एका प्रेयसीनं २० रुपयांच्या नोटेवर तिच्या प्रियकारासाठी विशेष संदेश लिहिला आहे. या प्रेयसीचं लवकरच लग्न होणार आहे. मात्र तिला प्रियकरासोबत पळून जायचं आहे. त्यामुळे पळवून नेण्यासाठी प्रेयसीनं प्रियकराला साद घातली आहे. त्यासाठी तिनं २० रुपयांच्या नोटवर एक खास संदेश लिहिला आहे. 'प्रिय दीपूजी, २६ एप्रिलला माझं लग्न आहे. मला तुमच्यासोबत पळवून न्या. तुमची पुष्पा. आय लव्ह यू,' असा मजकूर नोटेवर आहे. पुष्पा नावाच्या एका तरुणीचा २६ एप्रिलला विवाह होणार आहे. मात्र तिला विवाह करायचा नाही. तिला तिचा प्रियकर दीपूसोबत पळून जायचं आहे, ही गोष्ट २० रुपयांच्या नोटेवरील मजकुरामुळे स्पष्ट झाली आहे. आता या प्रेमकहाणीचा शेवट कसा होणार याची कल्पना कोणालाही नाही. सध्या इंटरनेटवर ही २० रुपयांची नोट चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर ती जोरदार व्हायरल झाली आहे.