pushpa wrote message for deepu on twenty rupee note went viral | २६ एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून न्या; २० रुपयांच्या नोटवरील 'मेसेज' व्हायरल

२६ एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून न्या; २० रुपयांच्या नोटवरील 'मेसेज' व्हायरल

पूर्वी प्रियकर-प्रेयसी एकमेकांना कबुतराच्या माध्यमातून प्रेमपत्र पाठवायचे. मात्र आता काळ खूप पुढे गेला आहे. नव्या जमान्यात संपर्क साधण्याची नवनवी माध्यमं उपलब्ध होत आहेत. मात्र हाय टेक मेसेजिंगच्या काळातही काही जण नोटांवर विशेष व्यक्तीसाठी विशेष संदेश लिहितात. काही महिन्यांपूर्वी 'सोनम गुप्ता बेवफा है' असा मजकूर असलेल्या एका नोटेचा फोटा व्हायरल झाला होता. यानंतर आता आणखी एका नोटेचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र हा मजकूर थोड्या वेगळ्या स्वरुपाचा आहे.

एका प्रेयसीनं २० रुपयांच्या नोटेवर तिच्या प्रियकारासाठी विशेष संदेश लिहिला आहे. या प्रेयसीचं लवकरच लग्न होणार आहे. मात्र तिला प्रियकरासोबत पळून जायचं आहे. त्यामुळे पळवून नेण्यासाठी प्रेयसीनं प्रियकराला साद घातली आहे. त्यासाठी तिनं २० रुपयांच्या नोटवर एक खास संदेश लिहिला आहे. 'प्रिय दीपूजी, २६ एप्रिलला माझं लग्न आहे. मला तुमच्यासोबत पळवून न्या. तुमची पुष्पा. आय लव्ह यू,' असा मजकूर नोटेवर आहे. 

पुष्पा नावाच्या एका तरुणीचा २६ एप्रिलला विवाह होणार आहे. मात्र तिला विवाह करायचा नाही. तिला तिचा प्रियकर दीपूसोबत पळून जायचं आहे, ही गोष्ट २० रुपयांच्या नोटेवरील मजकुरामुळे स्पष्ट झाली आहे. आता या प्रेमकहाणीचा शेवट कसा होणार याची कल्पना कोणालाही नाही. सध्या इंटरनेटवर ही २० रुपयांची नोट चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर ती जोरदार व्हायरल झाली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pushpa wrote message for deepu on twenty rupee note went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.