'पुष्पा' सिनेमासाठी अशी तयार केली गेली 'चंदनाची लाकडं', व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:37 IST2024-12-12T14:36:50+5:302024-12-12T14:37:21+5:30
Viral Video : ‘पुष्पा-२ द रूल’ सिनेमासाठी वापरण्यात आलेली चंदनाची लाकडं कशी बनवण्यात आली त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

'पुष्पा' सिनेमासाठी अशी तयार केली गेली 'चंदनाची लाकडं', व्हिडीओ व्हायरल
Viral Video : सुकुमार दिग्दर्शित अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा-२ द रूल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्डवर रेकॉर्ड बनवत आहे. अनेक सिनेमांचे कमाईचे रेकॉर्ड तोडत या सिनेमात छप्परफाड कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, साधारण सिनेमाने आतापर्यंत १ हजार कोटींपेक्षाही जास्त कमाई केली आहे.
‘पुष्पा-२ द रूल’ सिनेमातील वेगवेगळ्या गोष्टी लोकांना खूप आवडत आहे. पण एका गोष्टीकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं असेल ती म्हणजे सिनेमात दाखवण्यात आलेली चंदनाची लाकडं खरी आहेत की खोटी. अशात सिनेमासाठी वापरण्यात आलेली चंदनाची लाकडं कशी बनवण्यात आली त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
दरम्यान भारतात चंदनाचं झाड लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. सोबतच चंदनाचं लाकून विकणं, खरेदी करणं किंवा तस्करी करणंही बेकायदेशीर आहे. अर्थात पुष्पा सिनेमात दाखवण्यात आलेली लाकडंही नकलीच आहेत.
पुष्पा सिनेमा दाखवण्यात आलेली चंदनाची लाकडं थर्मोकॉल आणि सामान्य लाकडाच्या मदतीने बनवण्यात आली आहेत. या लाकडाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत बघू शकता की, लाकडांना लाल रंग पेंट केला जात आहे.
५५ सेकंदाच्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @osr_traders_9 नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २ कोटी २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ९ लाख २५ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.