याला काय अर्थ राव! आधी KISS करू दिलं, पण त्याने प्रपोज करताच गर्लफ्रेंडने भलतंच कृत्य केलं, Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:28 IST2023-02-08T16:27:30+5:302023-02-08T16:28:58+5:30
फेब्रुवारी महिना प्रेमासाठीही ओळखला जातो. या महिन्यात प्रेमाचा संपूर्ण आठवडा असतो, ज्याला व्हॅलेंटाईन डे वीक असेही म्हणतात.

याला काय अर्थ राव! आधी KISS करू दिलं, पण त्याने प्रपोज करताच गर्लफ्रेंडने भलतंच कृत्य केलं, Video
फेब्रुवारी महिना प्रेमासाठीही ओळखला जातो. या महिन्यात प्रेमाचा संपूर्ण आठवडा असतो, ज्याला व्हॅलेंटाईन डे वीक असेही म्हणतात. ७ फेब्रुवारी हा आठवड्याचा पहिला दिवस जगभरातील रसिकांनी रोज डे म्हणून साजरा केला. आज प्रपोज डे आहे. या दिवशी जोडपे आपले प्रेम व्यक्त करतात. पण, काही वेळा आपण ठरवलं तसं होईलच असे नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टोरंटो ब्लू जेस आणि बोस्टन रेड सॉक्स यांच्यात खेळला जाणारा मेजर लीग बेसबॉल सामना पाहण्यासाठी एक जोडपे यूएसमध्ये आले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये हे जोडपे एकमेकांना चुंबन घेताना दिसतेय. त्यानंतर प्रियकर गुडघ्यावर बसून प्रेयसीसमोर अंगठी सादर करून फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करतो.
प्रियकराने असे करताच प्रेयसीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि ती लगेच त्याला कानाखाली मारते. हे सर्व कॅमेर्यावर असल्याने सर्वजण पहात होते. तिच्याकडून अशी प्रतिक्रिया मिळेल याची कुणालाही अपेक्षा नव्हती, पण प्रियकराचा अपमान झाला होता. मैत्रीण इथेच थांबली नाही. तिच्या हातातील पॉपकॉर्नही तिने प्रियकराच्या चेहऱ्यावर फेकले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.