वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
By संतोष कनमुसे | Updated: October 16, 2025 09:48 IST2025-10-16T09:46:23+5:302025-10-16T09:48:01+5:30
ध्रुव राठी याने अभिनेता शाहरुख खान याने केलेल्या जाहिरातीवरुन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "इतकी अफाट संपत्ती असूनही शाहरुख खान आरोग्याला हानिकारक उत्पादनांची जाहिरात का करतो?, असा सवाल केला आहे.

वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ बॉलिवूडचा किंग प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची संपत्ती आणि त्याच्या पान मसाल्याच्या जाहिरात यावर आहे. या व्हिडीओमध्ये ध्रुव राठी याने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ध्रुव राठी याने अभिनेता शाहरुख खान याने केलेल्या जाहिरातीवरुन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "इतकी अफाट संपत्ती असूनही शाहरुख खान आरोग्याला हानिकारक उत्पादनांची जाहिरात का करतो?, असा सवाल केला आहे.
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
अहवालांनुसार, शाहरुख खानच्या नावाचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यांची एकूण मालमत्ता सुमारे १.४ अब्ज डॉलर, म्हणजेच सुमारे १२,४०० कोटी रुपये इतकी आहे. या संपत्तीवर दरवर्षी केवळ ७ टक्के व्याज मिळाले, तरी त्यातून जवळपास ८७० कोटी रुपये उत्पन्न होते. कर वगळल्यानंतरही हा आकडा ५०० कोटींहून अधिक राहतो. म्हणजेच, शाहऱुख खान याने फक्त व्याजाचे पैसे जरी खर्च केले तरी पैसे शिल्लक राहतील, असंही राठी याने म्हटले आहे.
दरम्यान, ध्रुव राठीने उपस्थित केलेला प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. इतका पैसा असताना, देशातील एक प्रसिद्ध अभिनेता 'पान मसाला'सारख्या हानिकारक उत्पादनांची जाहिरात का करतो? हा नैतिकतेचा आणि जबाबदारीचा प्रश्न आहे, असे राठीचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
ध्रव राठीच्या या प्रश्नांवरुन सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काहींनी राठीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे तर काहींनी शाहरुखचा बचाव करत हे केवळ व्यावसायिक करार असल्याचे सांगितले.
शाहरुख खानचा दबदबा कायम
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) अखेर अब्जाधीश बनला आहे. चित्रपटसृष्टीत ३३ वर्षे घालवल्यानंतर, या सुपरस्टारची एकूण संपत्ती आता $१.४ अब्ज म्हणजेच १२,४९० कोटी रुपये झाली आहे. १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ नुसार ही आकडेवारी आहे. शाहरुख खानने भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.
शाहरुख खानच्या संपत्तीत सर्वात मोठे योगदान त्याच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या प्रॉडक्शन हाऊसचे आहे, जे त्याने २००२ मध्ये सुरू केले. गेल्या दोन दशकात 'रेड चिलीज'ने अनेक हिट चित्रपट बनवले आहेत, तसेच व्हीएफएक्स (VFX) आणि डिजिटल उपक्रमांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आज ही कंपनी ५०० हून अधिक लोकांना रोजगार देते आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त नफा कमावणाऱ्या उद्योगांपैकी एक बनली आहे.