पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:52 IST2025-10-14T15:52:14+5:302025-10-14T15:52:55+5:30
एका माकडाने ५० हजार असलेली बॅग पळवली. तो झाडावर चढला आणि त्याने बॅगेतून पैसे काढत ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला.

पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील सोरावमध्ये एक अजब घटना घडली, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. एका माकडाने ५० हजार असलेली बॅग पळवली. तो झाडावर चढला आणि त्याने बॅगेतून पैसे काढत ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव केला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका वकिलाने आझाद सभागृहासमोर त्याची बाईक उभी केली होती. त्याने काही महत्त्वाची कागदपत्रं आणि नोटांचे बंडल बाईकच्या डिकीमध्ये ठेवले होते. अचानक एक माकड तिथे आला. त्याने हुशारीने डिकी उघडली, पैशांची बॅग काढली आणि कागदपत्रं ठेवली. त्यानंतर तो जवळच्या पिंपळाच्या झाडावर चढला.
अच्छे दिन का असर, बंदर भी पैसा लूटा रहा है😀संगम नगरी में बंदर ने पेड़ से की 500 रूपये के नोटों की बारिश pic.twitter.com/0kHQtQ9osl
— Dharmendra Singh (@dharmendra135) October 14, 2025
झाडावर चढताच माकडाने बॅग फाडली, रबरबँड काढला आणि नोटा खाली फेकू लागला. नोटांचे बंडल ५०,००० रुपयांचं होतं असा दावा केला जात आहे. अचानक ५०० रुपयांच्या नोटा हवेत उडू लागल्या. हे दृश्य पाहून उपस्थित असलेले लोक हैराण झाले. काही जण हसायला लागले, तर काही जण नोटा घेण्यासाठी धावले. परिसरात एकच गोंधळ उडाला.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, माकड झाडाच्या फांदीवर बसून ५०० रुपयांच्या नोटा खाली टाकत आहे. खाली असलेले लोक ओरडू लागले, तेव्हा त्याने नोटा हवेत फेकल्या आणि पळून गेला. वकिलाला काय घडलं हे समजेपर्यंत माकडाने नोटा हवेत उडवल्या होत्या. कोणीतरी याचा व्हिडीओ काढला आणि आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.