अतूट प्रेम! महाकुंभमध्ये हरवली सासू, ढसाढसा रडली सून; Video पाहून युजर्सचे पाणावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:27 IST2025-01-21T14:26:19+5:302025-01-21T14:27:02+5:30

Mahakumbh 2025 : महाकुंभसाठी गेलेल्या एका महिलेची सासू हरवली. यानंतर खूप वेळ शोधूनही जेव्हा सासू सापडली नाही तेव्हा सून ढसाढसा रडायला लागली.

prayagaraj Mahakumbh 2025 mother in law lost in the fair viral video | अतूट प्रेम! महाकुंभमध्ये हरवली सासू, ढसाढसा रडली सून; Video पाहून युजर्सचे पाणावले डोळे

अतूट प्रेम! महाकुंभमध्ये हरवली सासू, ढसाढसा रडली सून; Video पाहून युजर्सचे पाणावले डोळे

सोशल मीडियावर सासू-सुनेच्या नात्यांबद्दल अनेकदा विनोद आणि मीम्स खूप व्हायरल होत असतात. मात्र आता सासू हरवल्यानंतर अस्वस्थ झालेल्या एका महिलेच्या भावनांनी वेगळाच संदेश दिला आहे. या व्हिडिओने फक्त भावुक केलं नाही तर सासू-सूनेच्या नात्यातील अतूट प्रेम आणि त्यातील खरी काळजी देखील अधोरेखित केली. लोकांना या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून महिलेबद्दल सहानुभूती दाखवत आहेत.

महाकुंभसाठी गेलेल्या एका महिलेची सासू हरवली. यानंतर खूप वेळ शोधूनही जेव्हा सासू सापडली नाही तेव्हा सून ढसाढसा रडायला लागली. सोशल मीडियावर रडणाऱ्या महिलेच्या व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. महिला तिची सासू हरवली असल्याचं सांगते तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक तिचं सांत्वन करतात. घाबरून जाण्याची गरज नाही असं सांगत तिला दिलासा देतात. 


पोलिसांच्या मदतीने सासूला शोधून काढलं जाईल असं इतर लोक महिलेला सांगत आहेत. या व्हिडिओमधून हेही दिसून येतं की, ही परिस्थिती भावनिकदृष्ट्या त्रासदायक असली तरी समाजाचा पाठिंबा आणि सहकार्य नेहमीच उपयुक्त ठरतं. हा व्हायरल व्हिडीओ apna_bihar22 नावाच्या अकाउंटवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. 

"महाकुंभमधील मार्मिक दृश्य, सून सासूसाठी रडत आहे. आजच्या कलियुगात सासू-सुनेचं प्रेम हे फार कमी पाहायला मिळतं" असं व्हिडीओलो दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सासू-सुनेचं हे प्रेम पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. ते यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. 
 

Web Title: prayagaraj Mahakumbh 2025 mother in law lost in the fair viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.