पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅमेराचं नातं जुनं आहे. पण हे आम्ही नाही, लोक बोलतात. मोदी आणि त्यांचे कॅमेरासंबंधी देश-विदेशातील कितीतरी किस्से तुम्ही ऐकले किंवा पाहिले असतील. यांवरून त्यांचं कॅमेरा प्रेम नेहमीच दिसून आलं आहे. आता हा ताजा व्हिडीओच बघा ना.....पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस नुकताच झाला. ते त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुजरातमध्ये गेले होते. दरम्यान त्यांनी नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील खलवानी इको-टूरिज्म साइटचा दौरा केला. इथेच त्यांचा आणखी एक कॅमेराचा किस्सा घडला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. आता लोक त्यावर फारच मजेदार कमेंट्स करत आहेत.

याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असे कॅमेराचे किस्से तुम्ही अनेक पाहिले असतील. त्यातील एक सर्वात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्गला असंच त्यांनी बाजूला केलं होतं. त्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबतही स्टेजवर असाच एक किस्सा घडला होता.


Web Title: PM Narendra Modi moves official blocking camera video goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.