शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Viral Video: माणुसकी! स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कबुतराला वाचवायला उंच खांबावर चढला पोलीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:16 IST

या पोलीस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे

Viral Video: बंगळुरूच्या एका वाहतूक पोलिसाने सोशल मीडियावर जनतेची मने जिंकली आहेत. कबुतराचा जीव वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या जीवाचा धोका पत्करला. हे पाहून सर्व यूजर्सही थक्क झाले. धावपळीच्या या जीवनात अशी माणसे क्वचितच पाहायला मिळतात, जी एखाद्या व्यक्तीसाठीच नव्हे तर एखाद्या मुक्या प्राण्या-पक्ष्यासाठी आपला जीव धोक्यात घालतील. यामुळेच या पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसाचे लोक कौतुक करत आहेत. तसेच अशा लोकांमुळेच माणुसकी जिवंत आहे अशीही चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.

सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ २७ सेकंदांचा आहे. त्यामध्ये एक ट्रॅफिक पोलीस कबुतराला वाचवण्यासाठी कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय अनेक फूट उंच लोखंडी होर्डिंगवर चढताना दिसतो. तो अतिशय वेगाने आणि सावधगिरीने कबुतरापर्यंत पोहोचतो आणि पक्ष्याच्या पायात अडकलेला धागा सोडवतो. धागा सुटताच पक्षी मुक्त होतो आणि हवेत उडून जातो. पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडस आणि तळमळीसोबतच त्याच्या माणुसकीचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.

असे असले तरी, काही वापरकर्त्यांनी सांगितले की हे पोलीस कर्मचार्‍यांसाठी खूप धोकादायक असू शकते. थोडीशी चूक झाली असती तर त्याचा जीवही जाऊ शकला असता, असे काहींनी म्हटले. मात्र हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला याची पुष्टी झालेली नाही. बेंगळुरूचे वाहतूक पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्त कुलदीप कुमार आर जैन यांनी ट्विटरवर कबुतराची सुटका करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की- पोलीस कर्मचाऱ्याचा हा न पाहिलेला पैलू तुमच्या मनालाही समाधान देईल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडियाpigeonsकबुतर