वाह! वयस्कर जोडप्यानं धरला असा ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात.....
By Manali.bagul | Updated: January 31, 2021 16:42 IST2021-01-31T16:37:03+5:302021-01-31T16:42:07+5:30
Trending Viral News in Marathi : या आजी आजोबांनी नाचायला सुरूवात करताच आजूबाजूच्या लोकांचे डोळे उघडेच राहिले आहेत.

वाह! वयस्कर जोडप्यानं धरला असा ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात.....
सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असतील. पण असा व्हिडीओ याआधी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडीओत एका वयस्कर दाम्पत्यानं शेअर केला आहे. कोलकोता येथील एका वयस्कर दाम्पत्यानं 'वोह चली, वोह चली' या गाण्यावर डान्स केला आहे. या आजी आजोबांनी नाचायला सुरूवात करताच आजूबाजूच्या लोकांचे डोळे उघडेच राहिले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हा व्हिडीओ इंस्टाग्राम युजर @thebohobaalika ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कोलकातामधील रॉक कॅफेमधील आहे.
याठिकाणी एक ९० च्या दशकातील गाणं वाजवलं जात आहे. या वयस्कर दाम्पत्याचा डान्स पाहून नेटिझन्सने कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला आतापर्यत २८ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. बोंबला! नवरा झोपला होता; अन् बायकोनं ऑनलाईन कपडे विकण्यासाठी त्यालाच बनवलं मॉडेल
या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. प्रेमात हरवणं याला म्हणतात. अशी कमेंट काही जणांनी केली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी डान्स सुंदर असल्याचे म्हटले आहे. काय सांगता? कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं