शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

Viral Video: पक्ष्यांनाही असतं मन आणि भावना, पाहा या मिठूने किती कुत्र्याला कसं केलं प्रपोज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 18:50 IST

सध्या कोणत्या व्यक्तीचा नाही, तर एका पोपटाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. या पोपटाचा अनोखा अंदाज तुमचंही मन जिंकेल.

सोशल मीडियावर (Social Media) सतत काही ना काही वेगळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होताना पाहायला मिळतात. आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक रातोरात स्टार बनतात. मात्र, सध्या कोणत्या व्यक्तीचा नाही, तर एका पोपटाचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. या पोपटाचा अनोखा अंदाज तुमचंही मन जिंकेल.

या जगात फक्त माणूसच प्रेम करू शकतो, असं तुम्हाला वाटत असेल. मात्र, हे अगदी चुकीचं आहे. कारण माणसाप्रमाणेच प्राणी आणि पक्षांनाही प्रेम होऊ शकतं. अनेकदा हे प्राणी आणि पक्षी असं काही करतात जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक पोपट मालकाच्या मांडीवर बसलेल्या श्वानाला प्रपोज करताना दिसत आहे (Parrot Praposed to a Dog).

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video of Parrot) तुम्ही पाहू शकता की एक पांढऱ्या रंगाचा पोपट आपल्या मालकिणीच्या मांडीवर बसून काळ्या रंगाच्या श्वानाला बघत राहातो. यानंतर मालकीण त्याला म्हणते, डॉगीला सांग की तू त्याच्यावर खूप प्रेम करतो. हे ऐकताच पोपट डॉगीच्या कानाला अतिशय प्रेमाने कुरवळत त्याला आय लव्ह यू म्हणतो.

हा अनोखा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, पक्षी आणि प्राण्याच्या या प्रेमळ व्हिडिओनं माझं मन जिंकलं. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की पशु-पक्षी एकमेकांवर प्रेम करतात. मात्र आज डोळ्यांनी पाहिलं. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

हा मनमोहक व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर @animalshigh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही दिलं गेलं आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 20 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 8 हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम