वडिलांनी चिमुकलीला घेऊन केली अशी विचित्र मस्करी, की व्हिडिओ पाहुन तुम्ही म्हणाल, काय बाप आहे हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 18:55 IST2021-08-06T18:36:58+5:302021-08-06T18:55:08+5:30

एका पित्याने आपल्या मुलीचाच जीव धोक्यात घातला आहे. त्याने चक्क तिला फुग्यांना बांधले आहे. इन्स्टाग्राम (instagram)या सोशल मिडिया साईटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

papa did a prank with baby daughter mother got shocked video goes viral | वडिलांनी चिमुकलीला घेऊन केली अशी विचित्र मस्करी, की व्हिडिओ पाहुन तुम्ही म्हणाल, काय बाप आहे हा?

वडिलांनी चिमुकलीला घेऊन केली अशी विचित्र मस्करी, की व्हिडिओ पाहुन तुम्ही म्हणाल, काय बाप आहे हा?

आपल्या चिमुकल्यांची आपण विशेष काळजी घेतो. त्यांना काही होऊ नये म्हणून आईवडिल जिवापाड आपल्या बाळाची (baby) काळजी घेतात. मात्र एका पित्याने आपल्या मुलीचाच जीव धोक्यात घातला आहे. त्याने चक्क तिला फुग्यांना बांधले आहे. इन्स्टाग्राम (instagram)या सोशल मिडिया साईटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (father baby prank funny video)

खरंतर हा एक फनी व्हिडिओ (funny video)आहे. यात एक वडिल आपल्या मुलीला फुग्यांना बांधतात आणि आईला जोरात ओरडतात, आपली मुलगी उडतेय बघ. थोड्याच वेळात फुग्यांना बांधलेली मुलगी उडू लागते. आई धावत तिला पकडण्यासाठी धावते अन् पाहते तर काय? मुलीला वडिलांनी पकडलेय आणि ते मुलगी उडतेय अशी अ‍ॅक्टिंग करत आहेत. या व्हिडिओमध्ये आपल्या चिमुकलीला पाहुन आईचा जसा श्वास अडकला तसा हा व्हिडिओ पाहुन तुमचाही अडकला असेल.

सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ २६ लाखाहुन अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडिओ malluae यांनी शेअर केला आहे. एकाने तर या व्हिडिओवर कमेंट केलीय की त्याने हा व्हिडिओ १० वेळा बघितला.

Web Title: papa did a prank with baby daughter mother got shocked video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.