Pakistani Chacha Bike Protection Viral Video : पाकिस्तानात काहीही घडू शकतं असं आपण अनेकदा ऐकतो. असाच एक प्रकार सध्या व्हायरल होत आहे. एका पाकिस्तानी काकांच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर खूप खळबळ उडवून दिली आहे. त्या माणसाने त्याच्या बाईकला अपघातापासून वाचवण्यासाठी एक अनोखा 'देसी जुगाड' वापरला आहे. व्हायरल क्लिपमध्ये, त्या माणसाने त्याच्या बाईकभोवती लोखंडी सांगाडा बांधल्याचे दिसून येते. या जुगाडला नेटिझन्स 'सेफ्टी अल्ट्रा मॅक्स प्रो' असे म्हणत असून, खूप मजा घेत आहेत. तसेच काही युजर्स याची तुलना थेट 'झेड प्लस सिक्युरिटी'शी करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तानी व्यक्तीने त्याची बाईक पूर्णपणे लोखंडी सांगाड्याने सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. ही रचना इतकी मजबूत आहे की कोणत्याही अपघातात बाईकला फारसे नुकसान होणार नाही. तसेच, जड सांगाड्यामुळे बाईकचा तोल जाऊ नये म्हणून, त्याने दोन छोटी चाके जोडण्यात आली आहेत. पाहा व्हिडीओ-
पाकिस्तानी गायक नौमान शफी @naumanofficial यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहेत. हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर केला जात आहे आणि नेटिझन्स विविध कमेंट्स करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेक इंटरनेट युजर्स म्हणत आहेत की असा जुगाड फक्त पाकिस्तानमध्येच पाहायला मिळेल. काही लोकांना काकांची कल्पना खूपच आवडली आहे, तर काहींनी म्हटले आहे की हा जुगाड खास आहे.