पाकिस्तानात 18 वर्षाची तरूणी पडली 61 वर्षाच्या पुरूषाच्या प्रेमात, दोघांचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 13:32 IST2022-06-30T13:29:21+5:302022-06-30T13:32:35+5:30

Pakistan :  व्हायरल व्हिडीओत बघू शकता की, दोघेही एका मुलाखती दरम्यान त्यांच्या प्रेमाबाबत सांगत आहेत. तरूणीचं नाव आसिया आहे आणि व्यक्तीचं नाव शमशाद आहे.

Pakistan : 18 year old girl fell in love with 61 year old man their love story is amazing | पाकिस्तानात 18 वर्षाची तरूणी पडली 61 वर्षाच्या पुरूषाच्या प्रेमात, दोघांचा व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानात 18 वर्षाची तरूणी पडली 61 वर्षाच्या पुरूषाच्या प्रेमात, दोघांचा व्हिडीओ व्हायरल

Pakistan : असं म्हणतात की, प्रेम आंधळं असतं. ही बातमी वाचल्यावर तर तुम्हाला यावर पक्का विश्वास बसेल. हे प्रकरण आहे पाकिस्तानातील. इथे एक 18 वर्षीय तरूणी एका 61 वर्षीय पुरूषच्या प्रेमात पडली. दोघांची लव्हस्टोरी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या दोघांच्या कहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओत बघू शकता की, दोघेही एका मुलाखती दरम्यान त्यांच्या प्रेमाबाबत सांगत आहेत. तरूणीचं नाव आसिया आहे आणि व्यक्तीचं नाव शमशाद आहे.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे आसिया तिची लव्हस्टोरी जगासमोर सांगत आहे. तेच व्यक्तीही स्वत:ला नशीबवान मानत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 72 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

असं म्हटलं जातं की, प्रेम करणाऱ्या लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आता या दोघांची जोडीच बघा. आसियाचं वय 18 आहे आणि शमशादचं वय 61 वर्षे आहे. या दोघांमध्ये 43 वर्षांचं अंतर आहे. लोकांना यावरूनच त्यांना ट्रोल करण्याची संधी मिळाली आहे. व्हिडीओत बघू शकता की, दोघेही त्यांच्या आयुष्याबाबत फार आनंदी आहे.

Web Title: Pakistan : 18 year old girl fell in love with 61 year old man their love story is amazing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.