Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. जर आपल्याला रिकाम्या वेळात मेंदू आणि डोळ्यांची कसरत करायची असेल तर हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व्ह करू शकता. या फोटोंमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. ज्यात चांगला टाइमपासही होतो आणि डोळ्यांचा व्यायामही होते. त्यामुळेच हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांना देखील आवडतात. असाच एक फोटो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
आम्ही आपल्याासाठी जो फोटो आणला आहे, त्यात आपल्याला सगळीकडे 97 हा नंबर शोधायचा आहे. पण यात एक ट्रिक आहे. फोटोत केवळ 97 नाही. तर एक 67 नंबरही आहे. जो आपल्याला शोधायचा आहे. ज्यासाठी आपल्याकडे केवळ 4 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात कधी पक्षी शोधायचे असतात, कधी वेगळे नंबर, कधी वस्तू तर कधी चेहरे शोधायचे असतात. ज्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागते. कारण या फोटोंमध्ये गोष्टी अशा पद्धतीनं डिझाइन केलेल्या असतात की, त्या सहजपणे सापडत नाहीत.
पण जर आपले डोळे तीक्ष्ण असतील आणि आपल्या नजरेतून काहीच सुटत नाही असं वाटत असेल तर नक्कीच आपल्याला 4 सेकंदात फोटोतील 67 हा नंबर दिसेल. जर आधीच दिसला असेल तर आपण खरंच जीनिअस आहात.
जर आपल्याला फोटोतील 67 नंबर अजूनही दिसला नसेल तर पुन्हा एकदा शोधण्याचा प्रयत्न करा. यावेळी अधिक बारकाईनं फोटो बघा. यश नक्कीच मिळेल.
अनेकदा प्रयत्न करूनही आपल्याला यातील 67 नंबर दिसला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण फोटोतील वेगळा नंबर शोधण्यासाठी आम्ही आपली मदत करणार आहोत. खालच्या फोटोत आपण 67 हा वेगळा नंबर बघू शकता.
वरच्या फोटोत 67 हा नंबर स्क्वेअर केलेला बघू शकता.