Optical Illusion : कॉफी बीन्समध्ये लपलाय व्यक्तीचा चेहरा; भलेभले शोधून थकले, तुम्हाला 33 सेकंदात सापडतोय का पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 09:31 IST2022-06-08T08:52:36+5:302022-06-08T09:31:24+5:30
Optical Illusion : फोटोत तुम्हाला फक्त भरपूर कॉफी बीन्स दिसतील, पण अट अशी आहे की अवघ्या काही सेकंदात तुम्हाला यात लपलेला एका व्यक्तीचा चेहरा शोधावा लागणार आहे.

Optical Illusion : कॉफी बीन्समध्ये लपलाय व्यक्तीचा चेहरा; भलेभले शोधून थकले, तुम्हाला 33 सेकंदात सापडतोय का पाहा
नवी दिल्ली - सोशल मीडियावर रोज कुठल्या ना कुठल्या ऑप्टिकल इल्युजनची (Optical Illusion) चित्रं ही तुफान व्हायरल होत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकांना योग्य उत्तर शोधण्यासाठी अशी गुंतागुंतीची चित्रे पाहण्यात मजा येते. यामुळेच रोज नवनवीन इल्युजन चित्र समोर येत आहे. असंच काहीसं हे आता जोरदार व्हायरल होत असलेल्या नवीन ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये पाहायला मिळालं. या फोटोत तुम्हाला फक्त भरपूर कॉफी बीन्स दिसतील, पण अट अशी आहे की अवघ्या काही सेकंदात तुम्हाला यात लपलेला एका व्यक्तीचा चेहरा शोधावा लागणार आहे.
कॉफी बीन्समध्ये माणसाचा चेहरा?
ऑप्टिकल इल्युजनला फसवणूक करणारे चित्र असेही म्हणतात. ही तुमच्या तीक्ष्ण डोळ्यांची परीक्षा आहे, ज्यामध्ये तुम्हाला बुद्धीवरही जोर देण्याची गरज आहे. आपण फोटो नेमका कसा पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि तेच त्यांना खरोखर मनोरंजक, गंमतीशीर बनवतं. या कॉफी बीन्समध्ये तुम्हाला त्या माणसाचा चेहरा दिसतो का? फोटोचा खालचा भाग नीट पाहा आणि तो चेहरा शोधण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो ते सांगा.
तुम्ही हा फोटो काळजीपूर्वक पाहिला आहे का? तुम्ही नीट पाहिल्यास, कॉफी बीन्समध्ये माणसाचा चेहरा दिसेल आणि जर तो नसेल दिसला, तर काळजी करू नका कारण निकालावर जाण्यापूर्वी तुम्ही एक किंवा दोन संकेत वापरू शकता. चित्राच्या खालच्या अर्ध्या भागाकडे लक्ष द्या. कॉफी बीन्समध्ये माणसाचा चेहरा असू शकतो.
तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही पुरुषाचा चेहरा तीन सेकंदात पाहू शकत असाल, तर तुमचा उजवा मेंदू तुमच्या साथीदारांपेक्षा अधिक वेगवान आहे आणि जर तुम्ही तीन सेकंद ते एक मिनिटात पाहू शकत असाल तर तुमच्या मेंदूचा उजवा भाग पूर्ण विकसित झाला आहे. द माइंड्स जर्नलनुसार, जर तुम्हाला उत्तर देण्यासाठी एक मिनिट ते तीन मिनिटे लागली तर तुमच्या मेंदूची उजवी बाजू हळूहळू विकसित होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.