Optical illusion: ससा तो ससा...लपला कसा! चित्रात लपलेले ३ ससे ५ सेकंदात शोधून दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 20:15 IST2022-10-06T20:14:55+5:302022-10-06T20:15:44+5:30
'ऑप्टिकल इल्युजन' असलेली कोडी किंवा फोटो केवळ तुमच्या डोळ्यांनाच फसवत नाहीत तर तुमच्या मनालाही फसवतात. तुम्हाला वाटेल की तुम्ही चित्रात जे पाहत आहात ते अगदी बरोबर आहे.

Optical illusion: ससा तो ससा...लपला कसा! चित्रात लपलेले ३ ससे ५ सेकंदात शोधून दाखवा
'ऑप्टिकल इल्युजन' असलेली कोडी किंवा फोटो केवळ तुमच्या डोळ्यांनाच फसवत नाहीत तर तुमच्या मनालाही फसवतात. तुम्हाला वाटेल की तुम्ही चित्रात जे पाहत आहात ते अगदी बरोबर आहे. पण नंतर लक्षात येतं की तो एक भ्रम आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच चित्रांचा जणू महापूर आला आहे. ही कोडी सोडवताना अक्षरश: डोक्याचं दही होऊन जातं. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत. हे झाडाचं स्केच पाहा. यात तीन ससे कुठेतरी लपलेले आहेत. ते तुम्हाला ५ सेकंदात शोधून दाखवायचे आहेत. यात जर तुम्ही यशस्वी झालात तर तुम्हीच खरे तुर्रम खान!
ऑप्टिकल इल्युजन असलेल्या अनेक चित्रांबाबत असा दावा केला जातो की 99 टक्के लोक त्यांचे गूढ उकलण्यात अपयशी ठरतात. कदाचित हे चित्र त्या तोडीचं नसेलही म्हणूनच ५ सेकंदाची अट घालण्यात आली आहे. तुम्हाला या चित्रात लपलेले ससे शोधायचे तर आहेतच. पण त्यासाठी तुमच्याकडे केवळ ५ सेकंदाचा वेळ आहे. त्यामुळे हे कोडं वाटतं तितकं सोपं नाही. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका झाडाचं स्केच बनवलं आहे. ज्यावर एकही पान नाही. कलाकाराने तीन ससेही बनवून झाडाच्या फांद्यांत कुठेतरी लपवून ठेवले आहेत. या सशांना शोधून काढणं हेच आव्हान आहे. एका दृष्टीक्षेपात ते फक्त झाडासारखं दिसेल. पण नीट पाहिल्यावर त्यात लपलेले ससेही दिसू लागतील. मग उशीर कशाचा? तुमची वेळ सुरू होत आहे आता...
जर तुम्हाला चित्रात लपलेला एकही ससा शोधता आला नसेल, तर तो शोधण्यात आम्ही तुम्हाला थोडी मदत करतो. झाडाच्या आजूबाजूच्या फाद्यांकडे नीट लक्ष द्या, तुम्हाला ते तीन ससे तिथे कुठेतरी नक्कीच सापडतील. चला तर मग ते पटकन शोधून दाखवा आणि तरीही सापडले नाही, तर आम्ही तुम्हाला चित्रातील लाल वर्तुळात ते तीन लपलेले ससे नेमके कुठे आहेत ते दाखवतो.
हे आहे उत्तर...