Optical Illusion: सोशल मीडियावर दररोज नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून डोळे आणि मेंदू दोन्हींची कसरत होते. कारण या फोटोंमध्ये कधी काही लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात, तर कधी चुकांची उकल करायची असते. अशा प्रकारचे फोटो तुमच्या निरीक्षणशक्तीची चाचणी घेण्यासोबतच एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोनही उलगडून दाखवतात. असाच एक मजेशीर आणि मेंदूला गुंतवून ठेवणारा फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर असलेल्या गोष्टीच आपल्याला दिसत नाहीत. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. सोशल मीडियावरील असे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. कारण यातून चांगला टाइमपास होतो आणि मेंदूला चालनाही मिळते. आज आम्ही तुमच्यासाठी जो फोटो आणला आहे त्यात तुम्हाला वेगवेगळ्या नंबरमध्ये 3 हा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत अंकांची सीरिज दिलेली आहे. ज्यात 0 ते 9 सगळे अंक आहेत. पण यात 3 हा अंक शोधणं फार अवघड झालं आहे. जो तुम्हाला केवळ 3 सेकंदात शोधायचा आहे. जास्त वेळ घेऊन तुम्ही नक्कीच शोधाल पण ठरलेल्या वेळेत शोधाल तर तुमच्या डोळ्यांची टेस्ट होईल.
जर तुम्हाला यातील 3 अंक सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही जर तुम्हाला यातील 3 दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
जर अजूनही तुम्हाला यातील 3 नंबर सापडला नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्ही तो कुठे आहे ते बघू शकता.
वरच्या फोटोत 3 अंक हा बघू शकता.