Video : नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली, चिमुकलीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 13:34 IST2020-01-08T13:26:50+5:302020-01-08T13:34:27+5:30
एका लहान मुलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून हा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आहे.

Video : नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली, चिमुकलीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल....
एका लहान मुलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून हा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आहे. तसेच यातून पालकांचा बेजबाबदारपणाचा कळसही दिसून येतो. ही घटना स्पेनमधील Adeje आयलॅंडची आहे.
या व्हिडीओत दिसणाऱ्या मुलीची आई हॉटेलच्या रूममध्ये आहे. इतक्यात ही मुलगी तिसऱ्या मजल्यावर असलेल्या खिडकीतून बाहेर येते आणि भिंतीवरील कठड्यावरून चालू लागते. बरं पकडण्यासाठी भिंतीवर काहीच नाही. जर ती खाली पडली असतील तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने तसं काही झालं नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुलीची आई आंघोळीला गेली होती. खिडकी उघडी होती आणि मुलगी मस्ती करत खिडकीतून बाहेर कठड्यावर चालत गेली. या मुलीला काही झालेलं नसलं तरी पण अशाप्रकारची बेजबाबदारी चांगलीच महागात पडली असती. यावरून हे दिसून येतं की, लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावं लागतं आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सतत लक्ष द्यावं लागतं.