साध्या चपलेची किंमत तब्बल ६४ लाख रुपये ? का आहे ही चप्पल इतकी खास बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 13:03 IST2022-11-13T13:01:12+5:302022-11-13T13:03:13+5:30
आजकाल आपण बघतो अनेक प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव होत आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांनी वापरलेली वस्तू खरेदी करण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात.

साध्या चपलेची किंमत तब्बल ६४ लाख रुपये ? का आहे ही चप्पल इतकी खास बघा
आजकाल आपण बघतो अनेक प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव होत आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांनी वापरलेली वस्तू खरेदी करण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. मग ती अगदी साधी वस्तु का असेना. तर अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या चक्क चपलेचा लिलाव होतोय. साध्यासुध्या किंमतीत नाही तर या चपलेची किंमत ६४ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या विचारांना, त्यांच्या आयुष्याला अनेक जण फॉलो करतात. २०११ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांचे निधन झाले. त्यांच्यामुळेच आयफोन हा मोबाईलमधील अग्रगण्य ब्रॅंड झाला. त्यांच्यासारखी बिझिनेस स्ट्रॅटेजी हवी म्हणून अनेक जण प्रयत्न करतात.
स्टीव्ह जॉब्स यांच्या जुन्या चपलेचा लिलाव
त्यांच्या एका जुन्या सॅंडल चा लिलाव ११ नोव्हेंबरपासून सुरु झाला आहे. तर १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. स्टीव्ह जॉब्स इतके श्रीमंत असून अगदी साधे राहायचे. त्यांचा हाच अंदाज सर्वांना आवडायचा. त्यांच्याच अगदी साध्या चपलेचा हा लिलाव होत असून यावर लाखोंची बोली लागली आहे. तपकिरी रंगाच्या बर्किन्स्टॉक ऍरिझोना सॅंडलचा ज्युलियन्स ऑक्शनद्वारे लिलाव होत आहे. सोबतच एनएफटी फोटो आणि एका पुस्तकाचाही लिलाव होत आहे.
या लिलावातून ६४ लाख रुपये उभारले जातील असा अंदाज उभारला जात आहे. स्टीव्ह यांच्या पत्नी म्हणतात, या चपला घातल्यामुळे त्यांना बिझिनेसमॅन सारखे वाटायचेच नाही.