ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सेंटर ने एका छोट्याश्या कुत्र्याला नोकरीवर ठेवलं आहे. जेणेकरून या कुत्र्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर हसू येईल. सोशल मीडियावर या क्यूट कुत्र्याचे फोटोज व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या कुत्र्याच्या गळ्यात एक आयडीसुद्धा तुम्ही पाहू शकता. या आयडी कार्डवर कुत्र्याचे नाव लिहिले आहे. या कुत्र्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या कुत्र्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यांनी कोरोनाच्या माहामारीत रुग्णालयातील कर्मचारी आणि इतर रुग्णांना चांगले वाटावे म्हणून काम केलं होतं.
डॉक्टर शारी डूना वे एमडी यांनी २० नोव्हेंबरला हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्यांना या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, माझ्या रुग्णालयाने एका क्यूट एम्प्लॉयला नोकरीवर ठेवले आहे. या कुत्र्याचे काम इतर कर्मचारी आणि रुग्णांना Hi म्हणत फिरण्याचे आहे. जेणेकरून या कुत्र्याला पाहून इतरांचा ताण हलका होईल आणि त्यांना बरं वाटेल. आतापर्यंत या फोटोला ६३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून १० हजारापेक्षा जास्त लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. रात्री गर्लफ्रेंडला भेटायला गेला, तिच्या घरच्यांनी चोप चोप चोपला, अन् सकाळी त्यालाच बनवलं जावई
याआधीही एका कुत्र्याचे फोटो व्हायरल झाले होते. या कुत्र्याला ह्युंदाई शोरूममध्ये सेल्समनचं काम मिळालं होतं. आधीच जो कुत्रा शोरूम बाहेर फिरत होता. आता कुत्रा शोरूमच्या आत सेल्समन म्हणून करत आहे. यासाठी त्याला एक आयकार्डही देण्यात आलं होतं. ही घटना ब्राझीलमध्ये घडलेली. येथील कार निर्मिती कंपनी ह्युंदाईने टक्सन नावाच्या कुत्र्याला आपलं सेल्समन बनवलं होतं. आधी हा कुत्रा ह्युंदाई शोरूमच्या बाहेर फिरत होता. हळूहळू तो शोरूममधील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच मिसळला. त्याचं चांगलं वागणं पाहून शोरूममधील लोकांनी त्याला आपल्यासोबत जोडलं. इतकेच नाही तर त्याचं प्रॉपर आयडी कार्डही बनवलं. बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी