अरेच्चा! पाच डोळे अन् पाच ओठ असणाऱ्या 'या' तरुणीला तुम्ही पाहिलं आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 15:13 IST2021-07-18T15:05:25+5:302021-07-18T15:13:48+5:30
तुम्ही दोन तोंडाची माणसं बघितली असतील. ६ बोटाच्या व्यक्तीही बघितल्या असतील पण ही ५ डोळे आणि ५ ओठांची तरुणी कोण आहे ते बघा...

अरेच्चा! पाच डोळे अन् पाच ओठ असणाऱ्या 'या' तरुणीला तुम्ही पाहिलं आहे का?
जगात अनेक चित्रविचित्र माणसं असतात. त्यांच्या चित्रविचित्र दिसण्यामुळे ती प्रसिद्धही होतात. अशीच एक तरुणी आहे जिला ५ डोळे आणि ४ ओठ आहेत. तुम्ही दोन तोंडाची माणसं बघितली असतील. ६ बोटाच्या व्यक्तीही बघितल्या असतील पण ही ५ डोळे आणि ५ ओठांची तरुणी कोण आहे ते बघा...
When the edibles hit… pic.twitter.com/BSeBnAAES9
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) July 15, 2021
नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीला 5 डोळे, 5 ओठ दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. रेक्स चॅपमॅन याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जे दाखवलं गेलंय ती सर्व मेकअपची जादू आहे. मेकअप आर्टिस्टने अत्यंत सफाईदारपणे चेहऱ्यावर खोटे डोळे आणि ओठ तयार केले आहे. ज्यामुळे खरे डोळे आणि ओठ कोणते हे ओळखणं अवघड झालं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहत आहात की, तरुणी ओठांवर लिपस्टिक लावत आहे. ज्याच्या काही सेंकदनंतर तरुणी डोळे उघतले. तेव्हा लक्षात येतं की चेहऱ्यावर खोटे ओठ आणि डोळे तयार केले आहेत.