अरे बापरे! तरुणी पडली एका कैद्याच्या प्रेमात, ४ खुन केल्याप्रकरणी भोगतोय शिक्षा, दोघेही लवकरच लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 18:15 IST2021-07-11T18:14:42+5:302021-07-11T18:15:33+5:30
एका तरुणीने कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका गुन्हेगाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने चार जणांची गोळी मारून हत्या केली होती. बसला ना शॉक?

अरे बापरे! तरुणी पडली एका कैद्याच्या प्रेमात, ४ खुन केल्याप्रकरणी भोगतोय शिक्षा, दोघेही लवकरच लग्नबंधनात
असं म्हणतात प्रेम आंधळ असतं पण इतकं की तुमचा विश्वासच बसणार नाही. घटनाच तशी आहे! एका तरुणीने कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका गुन्हेगाराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने चार जणांची गोळी मारून हत्या केली होती. बसला ना शॉक?
डच महिला कैली हिला कैदी जेम्स डेंटल यासोबत लग्न करायचं आहे. जेम्सने चार जणांचा खून केला आणि तो कारागृहात २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. तो युएसच्या ओरेगन कारागृहात कैद आहे. मुख्य म्हणजे कैलीने याला एकदाही पाहिलेले नाही. तरीही ती त्याच्यावर प्रेम करते.
इमेलद्वारे या महिलेची या कैद्यासोबत ओळख झाली. त्यानंतर फोन कॉल्स, लेटरद्वारे त्यांच्यात संभाषण होऊ लागले. पुढेपुढे संभाषण वाढले आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. कैलीला हे नाते जगासमोर आणायचे नव्हते पण जेम्सने तिला व्हिडिओ कॉलद्वारे प्रपोज केले आणि ती लगेच हो बोल्ली. आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. तेही जेम्सला कारागृहाबाहेर यायला अजून १० वर्ष शिल्लक राहिली असताना. म्हणजेच हे दोघे लग्न होऊनही १० वर्ष एकमेकांपासून वेगळे राहणार आहेत. जेम्सने कैलीला एक अंगठीही पाठवली होती. एका कैदी मित्राच्या मदतीने हि अंगठी त्याने कैलीला पाठवली.
दरम्यान आपला जावई कैदी असल्याचे समजताच तिच्या आईवडिलांनाही धक्का बसला होता. कैलीने त्यांना समजावले पण ते या लग्नाला तयार होत नव्हते. अखेरीस कैलीने त्यांची जेम्स बरोबर फोनवर बातचीत करून दिली तेव्हा ते तयार झाले.