Coronavirus: देशात 5G नेटवर्कच्या चाचणीमुळं कोरोनाचा कहर अन् मृत्यूंची संख्या वाढतेय? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 02:03 PM2021-05-08T14:03:13+5:302021-05-08T14:07:04+5:30

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्याबद्दल आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे

Number of deaths & coronavirus increasing due to testing of 5G network in country? Know the truth | Coronavirus: देशात 5G नेटवर्कच्या चाचणीमुळं कोरोनाचा कहर अन् मृत्यूंची संख्या वाढतेय? जाणून घ्या सत्य

Coronavirus: देशात 5G नेटवर्कच्या चाचणीमुळं कोरोनाचा कहर अन् मृत्यूंची संख्या वाढतेय? जाणून घ्या सत्य

Next
ठळक मुद्देकोणताही आजार कारणीभूत नाही तर ५ जी टॉवरच्या टेस्टिंगमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशन जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होतेय तसेच मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. ५ जी नेटवर्कमुळे कोरोना वाढत असल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला आहे.

नवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये वेगाने वाढणाऱ्या कोरोना संक्रमणासाठी ५ जी टेस्टिंगशी जोडलेला दावा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा केलाय की, भारतात सध्या कोरोना व्हायरसची दुसरी लाट पसरली आहे. यात जितक्या संख्येने मृत्यू होत आहेत. त्यासाठी कोणताही आजार कारणीभूत नाही तर ५ जी टॉवरच्या टेस्टिंगमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशन जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्याबद्दल आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मोबाईल आणि इंटरनेट सेवा कंपन्यांचे व्यासपीठ असलेले सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सोशल मीडियात व्हायरल होणारा दावा चुकीचा आणि खोटा असल्याचं म्हटलं आहे. सीओएआयने देशात कोविड १९ महामारीच्या लाटेमागे 5G तंत्रज्ञानाबद्दल चुकीची अफवा पसरवत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, सोशल मीडियावरील काही मेसेज आणि काही वृत्तपत्रात ५ जी स्पेक्ट्रम चाचणीमुळे देशात कोरोना झपाट्याने पसरत असल्याचा दावा केला आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आणि निराधार असून यात काहीही तथ्य नाही. अशाप्रकारच्या चुकीच्या दाव्यावर विश्वास ठेऊ नये. जगातील अनेक देशात ५ जी नेटवर्कची सुरुवात याआधीच झाली आहे. लोक सुरक्षितपणे या सुविधांचा वापर करत आहेत. इतकचं नाही तर ५ जी नेटवर्क आणि कोविड १९ यात कोणताही संबंध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केलं असल्याचं सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक एस. पी कोच्चर यांनी सांगितले.

पीआयबी फॅक्ट चेकनेही या व्हायरल होणाऱ्या मेसेजवर भाष्य केले आहे. पीआयबीने ट्विट केले आहे की, अनेक राज्यात ५ जी नेटवर्कची चाचणी करण्यात येत आहे. ज्या कारणामुळे लोकांचा मृत्यू होतोय आणि त्याला कोविड १९ आजाराचं नाव दिलं जात आहे. हा दावा खोटा आहे. कृपया अशा व्हायरल मेसेजच्या माध्यमातून गैरसमज निर्माण करू नये असं आवाहन त्यांनी केले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Number of deaths & coronavirus increasing due to testing of 5G network in country? Know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app