शहरं
Join us  
Trending Stories
1
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
2
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
3
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
4
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
5
५ कारणांमुळे बाजार हादरला! सेन्सेक्स २१०० अंकांनी कोसळला; परदेशी गुंतवणूकदारांनी मोडले कंबरडे
6
प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
7
'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
8
‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
9
आईची माया! शहीद मुलाला थंडी वाजू नये म्हणून पुतळ्यावर घातलं ब्लँकेट, भावूक करणारा Video
10
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
11
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
12
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
13
'विराट' दूरावा संपला! ज्या गोष्टीपासून लांब राहिला, तिकडे पुन्हा वळला किंग कोहली; ‘यू टर्न’ चर्चेत
14
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
15
ना कुठली जोखीम, ना पोलिसांचं टेन्शन...आता लेट नाइट पार्टीनंतर VVIP सारखं घरी जाऊ शकता, कसं?
16
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
17
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
18
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
19
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
20
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
Daily Top 2Weekly Top 5

ना थांबा, ना विश्रांती… 'अमूर ससाणा'चा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:54 IST

एक पक्षी न थांबता साधारण किती उडू शकतो? १००, ५००, किंवा अगदी १००० किमी. पण एका अमूर ससाणाने त्याच्या उडण्याच्या कौशल्याने सर्वांना धक्का दिलाय. फक्त १५० ग्रॅम वजनाच्या या अमूर ससाणाने ६,००० किमी पेक्षा जास्त अंतर फक्त सहा दिवसांत पार केले आहे.

एक पक्षी किती प्रवास करु शकतो? १००, ५०० किंवा १००० किलोमीटर? पण एका गरुडाने नवीन विक्रम केला आहे. त्या अमूर ससाणाची क्षमता पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. अवघे १५० ग्रॅम वजन असलेल्या या गरुडाने तब्बल ६००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर न थांबता, न विश्रांती घेता पार केले.

मणिपूरच्या जंगलातून या अमूर ससाणाने प्रवासाला सुरुवात केली. हा अमूर ससाणा एका आठवड्यापेक्षा कमी वेळात थेट केनियात पोहोचला. या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत आणखी  दोन अमूर सणा होते. त्यानी अनुक्रमे ५६०० आणि ५१०० किमीचे अंतर गाठले.

Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद

 सर्व पक्ष्यांवर उपग्रह-टॅगद्वारे सतत लक्ष ठेवले जात आहे. या स्थलांतराच्या नोंदी पाहून संशोधक आणि शास्त्रज्ञही थक्क झाले आहेत.

या तीन अमूर ससाणाची नावे अपापांग, अलंग आणि आहू अशी असून, तिघांनीही प्रवासादरम्यान प्रचंड ताकद दाखवली. यापैकी नारंगी रंगाचा मार्कर असलेला अपापांग सर्वांत वेगवान ठरला. अपापांगने अवघ्या सहा दिवस आणि आठ तासांत ६१०० किमीचा प्रवास पूर्ण केला.

तो ईशान्य भारतातून उड्डाण करून द्वीपकल्पीय भारत, अरबी समुद्र आणि आफ्रिकेतील घनदाट जंगल ओलांडत थेट केनियाला पोहोचला. एका छोट्या आकाराच्या पक्ष्याने एकाच उड्डाणात इतके लांब अंतर पार केल्याची ही पहिलीच नोंद असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

आणखी एकाचा पराक्रम

दुसऱ्या अमूर ससाणाचे, तिघांपैकी सर्वात लहान असलेल्या अलंगचे, पिवळ्या रंगाचे चिन्ह होते. अलंगने ५,६०० किलोमीटरचा प्रवास सहा दिवस आणि १४ तासांत पूर्ण केला. या प्रवासादरम्यान, त्याने तेलंगणामध्ये रात्रीची विश्रांती घेतली आणि महाराष्ट्रात आणखी तीन तासांचा ब्रेक घेतला. त्यानंतर, तो थेट केनियाला गेला. तरूण अमूर ससाणाने पहिल्यांदाच एवढे अंतर कापले आहे.

तिसऱ्या अमूर ससाणाचे नाव, आहू, लाल रंगाचे आहे. त्याने थोडेसे उत्तरेकडे उड्डाण केले, पश्चिम बांगलादेशात थोडा वेळ थांबले आणि नंतर अरबी समुद्रावरून आपला प्रवास पुन्हा सुरू केला. पाच दिवस आणि १४ तासांत ५,१०० किमी प्रवास केल्यानंतर, आहू उत्तर सोमालियात उतरला.

English
हिंदी सारांश
Web Title : Unstoppable: Eagle Flies 6100 km From Asia to Africa in Days

Web Summary : A 150-gram eagle flew 6100 km non-stop from Manipur to Kenya in under a week. Two other eagles flew 5600 km and 5100 km. Researchers are amazed by this migration. The fastest eagle, Apapang, completed the journey in six days.
टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल