ना सायकल ना बाईक, स्विगी बॉयने फुड डिलिव्हरी करण्यासाठी लढवली नामी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 18:08 IST2021-07-05T18:07:16+5:302021-07-05T18:08:08+5:30

तुम्ही बघितलं असेल की फुड डिलीवरी करणारे कधी सायकलवरून फुड डिलीवरी करतात तर काही मोटरसायकलवरून. मात्र एका फुड डिलीवरीबॉयने तर कमालच केली. फुड डिलीवरी करण्यासाठी त्याने अशी काही युक्ती केली की बघणारे बघतच राहिले.

Neither bicycle nor bike Swiggy Boy fought for food delivery | ना सायकल ना बाईक, स्विगी बॉयने फुड डिलिव्हरी करण्यासाठी लढवली नामी शक्कल

ना सायकल ना बाईक, स्विगी बॉयने फुड डिलिव्हरी करण्यासाठी लढवली नामी शक्कल

तुम्ही बघितलं असेल की फुड डिलीवरी करणारे कधी सायकलवरून फुड डिलीवरी करतात तर काही मोटरसायकलवरून. मात्र एका फुड डिलीवरीबॉयने तर कमालच केली. फुड डिलीवरी करण्यासाठी त्याने अशी काही युक्ती केली की बघणारे बघतच राहिले.

सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत मग सामान्यांनी काय करावं. स्विगीमध्ये फुड डिलिवरी करणाऱ्या एका तरुणाने यावर एक नामी शक्कल लढवली. तो चक्क स्केटिंग करतच फुड डिलिवरी करायला निघाला. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि कमेंटचा धो धो पाऊस पडला. कुणी म्हणालं पेट्रोलचे दर वाढल्यानं या पठ्ठ्यानं ही युक्ती केली. अ‍ॅडल्ट ह्युमरच्या इन्स्टाग्राम हँडलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. याला ५० हजाराच्या वर लाईक्स मिळाले आहेत. 

Web Title: Neither bicycle nor bike Swiggy Boy fought for food delivery