शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नीरजने हाक मारली, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने धावत येऊन तिरंग्यासोबत काढला फोटो (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 10:28 IST

नीरज पोज देत असताना अर्शद बाजूला उभा होता, तेव्हा अचानक हा किस्सा घडला, पाहा VIDEO

Neeraj Chopra Arshad Nadeem, India Pakistan: भारतीय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले. पोस्ट मॅच प्रेंझेटशनमध्ये तिरंगा फडकावल्यानंतर आणि राष्ट्रगीत गायल्यानंतर जल्लोष झाला. चोप्राने भारतासाठी ऐतिहासिक पहिले सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या संधीत 88.17 च्या फेकीसह त्याने स्पर्धेत दमदार प्रवेश केला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 अंतरासह रौप्य पदक जिंकले, हे त्याच्या देशासाठी पहिले जागतिक अजिंक्यपद पदक ठरले. तर झेक प्रजासत्ताकच्या जाकुब वडल्जेने गेल्या वर्षी ओरेगॉनमध्ये 86.67 अंतरासह जिंकलेले कांस्यपदक कायम ठेवले. या दरम्यान, कॅमेरामनला पोज देताना नीरजने असे काही केले की त्याने संपूर्ण जगाची मने जिंकली. कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानच्या रौप्यपदक विजेत्या खेळाडू अर्शद नदीमलाही त्याने व्यासपीठावर पोज देण्यासाठी बोलावले. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर पोज दिली आणि सांगितले की, प्रयत्न केले तर प्रेम आणि मैत्रीचा संदेशही देता येईल.

सोशल मीडियावर या फोटोंचे कौतुक होत आहे. गमतीची गोष्ट म्हणजे नीरजच्या हातात तिरंगा होता, त्याने तो तिरंगा खांद्यावर घेऊन फोटो काढला. टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये नीरजच्‍या भाल्याला हात लावल्‍यामुळे अर्शद वादात सापडल्‍याचा हा क्षण साऱ्यांना लक्षात होता. पण नीरजने त्याला मोठ्या मनाने यावेळी बोलावले आणि दोघांनी एकत्र फोटो पोज दिली. बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजने अभिमानाने भारतीय तिरंगा हातात धरलेला दिसला. हंगेरी येथे सुरू असलेल्या चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नदीमने आपल्या भारतीय खेळाडूसोबतचा एक अप्रतिम क्षण शेअर केला. नदीमने देखील प्रतिस्पर्धाच्या ध्वजासोबत फोटो काढल्याने त्याचे कौतुक झाले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पोस्ट केले- आमच्या मुलतान स्टार अर्शद नदीमला सपोर्ट करा. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तू पाकिस्तानसाठी पहिले पदक विजेता ठरल्यामुळे आम्हाला तुझ्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो. काही सोशल मीडिया युजर्सनी कॅमेऱ्यासमोर पोज देताना त्याने पाकिस्तानचा झेंडा का धरला नाही असा सवाल केला. पण त्यावरून फारसा वादंग झाला नाही.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राPakistanपाकिस्तानIndiaभारत